Godavari River : नांदेडमध्ये गोदावरीचा गुदमरतोय श्वास ; पात्रात सांडपाणी, जलपर्णीचाही बसलाय वेढा,महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज

नांदेड हे गोदावरी नदी तीरावर वसलेले शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, शहराजवळून वाहणाऱ्या या नदीच्या पात्रात सांडपाणी सोडले जात आहे. त्याशिवाय जलपर्णीचाही वेढा बसलाय. त्यामुळे पाण्यावर हिरवी चादर पसरली आहे. जलपर्णीमुळे अन्य कचरा, घाण पाण्यात साचत आहे.
Godavari River
Godavari River sakal
Updated on

नांदेड : नांदेड हे गोदावरी नदी तीरावर वसलेले शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, शहराजवळून वाहणाऱ्या या नदीच्या पात्रात सांडपाणी सोडले जात आहे. त्याशिवाय जलपर्णीचाही वेढा बसलाय. त्यामुळे पाण्यावर हिरवी चादर पसरली आहे. जलपर्णीमुळे अन्य कचरा, घाण पाण्यात साचत आहे. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, गोदावरीला श्वास मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

गोदावरी नदीत दरवर्षी जलपर्णी वाढते. ती वेळोवळी काढणे आवश्यक असते. जलपर्णी वाढल्याने पाण्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. शिवाय पाणी दूषित होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पर्यावरणतज्ज्ञांनी नदीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे; तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

पाणी प्रवाहित नसल्यामुळे जलपर्णी निर्माण होते. जलपर्णीमुळे प्राणवायू न मिळाल्यास मासे किंवा इतर जलचर प्राणी दगावतात. जेसीबीद्वारे लकरच जलपर्णी काढण्याचे काम सुरू होणार आहे.

- सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता, महापालिका, नांदेड

आम्ही अनेक वर्षांपासून या विषयवार आंदोलन करत आहोत. परंतु, प्रशासनाने यावर कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आलेला असताना त्याचे काय झाले, हा खरा प्रश्न आहे.

- गौतम जैन, पर्यावरणप्रेमी, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.