Nanded News : गोदावरीच्या पात्राला प्रदूषणाचा विळखा

शहरातील १८ नाल्याचे सांडपाणी पात्रात : महापालिकेची बघ्याची भूमिका
godavari
godavarisakal
Updated on

नांदेड : गोदावरीच्या वाढत जाणार्‍या प्रदूषणामागे अनेक कारणे उघड झाली आहेत. पाणीटंचाईमुळे गोदावरीच्या मूळ प्रवाहालाच घातला गेलेला बांध, मुख्य प्रवाहातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे पात्राचा झालेला संकोच व त्यात लाखो लिटर सांडपाण्याचा दररोज येणारा प्रवाह यामुळे पवित्र गोदावरीची गटारगंगाच झाली आहे.

गोदावरीच्या वाढत जाणाऱ्या प्रदूषणामागे अनेक कारणे उघड झाली आहेत. पाणीटंचाईमुळे गोदावरीच्या मूळ प्रवाहालाच घातला गेलेला बांध, मुख्य प्रवाहातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे पात्राचा झालेला संकोच व त्यात लाखो लिटर सांडपाण्याचा दररोज येणारा प्रवाह यामुळे पवित्र गोदावरीची गटारगंगाच झाली आहे. त्यावर उपाय म्हणून प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पाठवलेला गोदावरी कृती आराखडा तब्बल दोन वर्षांपासून शासनदरबारी भिजत पडला असून, गोदावरी गटारीकरणविरोधी मंचसारख्या सामाजिक संस्था उच्च न्यायालयात गेल्यानंतर केवळ सफाईसारख्या योजनांवर भर दिला जात असला तरी प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या मुख्य स्रोतांकडे मात्र दुर्लक्षच झाले आहे.

godavari
Nanded News : जलजीवन मिशनचे १५ कंत्राटदार काळ्या यादीत

गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविणे आहे शक्य

गोदावरीच्या पात्रामध्ये शहरातील १८ नाल्यांचे सांडपाणी मिसळत असल्याने प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे. कारण, सांडपाण्यात प्रामुख्याने वेगवेगळे रासायनिक घटक असतात. जसे कार्बोनेट, नायट्रेटस, फॉस्फेटस यापैकी नायट्रेटस, फॉस्फेटस हे शेवाळ वाढीसाठी पूरक न्यूट्रीअन्ट्स् आहेत. जितके जास्त नायट्रेटस, फॉस्फेटस तितकेच जास्त शेवाळ वाढण्यास मदत होते. नदीच्या तळाशी असलेल्या न्यूट्रीअन्ट्स् वापर करून शेवाळ हळूहळू पाण्याचा वरच्या स्तरावर पसरतात.

टॉक्सिनमुळेच मरण पावतात मासे

शेवाळ स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, यासाठी ते हवेतील कार्बनडायऑक्साईड, सूर्यप्रकाश व शेवळातील क्लोरोफीलचा वापर करतात. अशा अती प्रमाणात वाढलेल्या शेवाळाने पाण्यावर दाट हिरवळ पसरते; ती पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी होते. तसेच नैसर्गिकरित्या शेवाळ हे टॉक्सीन तयार करते.

मानवाच्या निष्काळजीपणाचा परिणाम

या सगळ्या नैसर्गिक प्रक्रियेला ‘यूट्रोफीकेशन’ असे म्हणतात. यामुळे गोदावरी नदीतील लाखो मासे मृत्यूमुखी पडले. हे पशु व मानवासाठी सुद्धा हानीकारक आहे. हे प्रदूषण समाजाने संघटित होऊन, वैज्ञानिकदृष्ट्या काम केल्यास यावर मात मिळवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.