विधायक : लॉकडाउनमध्ये बाप- लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : आदिवासी क्षेत्रातील किनवट तालुक्यात असलेल्या मुळझरा येथील बाप- लेकानी लॉकडाउनचा फायदा घेतला. त्यांनी चक्क आपल्या अंगणात सोळा फूट विहीर अवघ्या पाच दिवसात मिळेल त्या साहित्याने खोदली. निसर्गाची किमयासुध्दा की या विहीरीला खळखळून पाणी लागले. टंचाईग्रस्त या गावाची तहान या विहीरीमुळे मिटणार आहे. या बाप- लेकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मुळझरा येथील सिद्धार्थ यांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात विहीर खोदण्याचे ठरवले. आणि पहाता- पहाता कामाला सुरुवात केली. या कामी त्यांना त्यांचा मुलगा पंकज याने साथ दिली. दोघे दिवस उजाडला की दिवसभर विहीर खोदायचे. हा नित्यक्रम पाच दिवस चालला. पाचव्या दिवशी सिद्धार्थ आणि पंकज यांच्या कष्टाचे चीज झाले. विहिरीला पाणी लागलं. तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

बाप- लेकाने पाच दिवसात १६ फूट विहीर खोदली

लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून घरात राहणे अनेकांना कंटाळवाणे झालेले आहे. मात्र, याच काळाचा सदुपयोग करीत एका बाप- लेकाने पाच दिवसात १६ फूट विहीर खोदली. या विहिरीला चांगले पाणी लागण्याने पिण्याच्या पाण्याची समस्या मिटल्याने, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. सिद्धार्थ देवके आणि त्याचा मुलगा पंकज यांनी ही अफलातून कामगिरी केली आहे. मुळझरा हे दुर्गम गाव म्हणून ओळखला जातो. या गावात सिद्धार्थ देवके आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा बँडबाजाचा व्यवसाय आहे. मात्र लॉकडाऊनमुळे लोकं मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न उरकत आहेत.
 
घरासमोरील अंगणात विहीर खोदण्याचे ठरवले

त्यामुळे सिद्धार्थ यांच्याकडे लॉकडाऊनमध्ये काही काम नव्हते. तेव्हा त्यांनी दरवर्षी पाण्यासाठी होणारी भटकंतीचा विचार करून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ यांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात विहीर खोदण्याचे ठरवले आणि कामाला सुरुवात केली. या कामी त्यांना त्यांचा मुलगा पंकज याने साथ दिली. दोघे दिवस उजाडला की दिवसभर विहीर खोदायचे. हा नित्यक्रम पाच दिवस चालला. पाचव्या दिवशी सिद्धार्थ आणि पंकज यांच्या कष्टाचे चीज झाले. विहिरीला पाणी लागलं. तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कारण त्यांनी पाण्याच्या टंचाईवर कायमची मात केली.

एक अनोखी व इतरांना आदर्शवत कामगिरी

सिद्धार्थ आणि पंकज या बाप लेकांनी अवघ्या पाच दिवसात सोळा फूट विहिर खोदली. आता ते कच्च्या स्वरूपात खोदलेल्या या विहिरीसाठी सिमेंटचे कठडे देखील घरीच बनवत आहेत. दरम्यान, पाणीटंचाईची समस्या ही प्रत्येक उन्हाळ्यात मुळझरा येथे पाचवीला पुजलेली असते. त्यामुळे पाण्याचे मोल येथील प्रत्येक नागरिकाला समजते. सिद्धार्थ आणि पंकज यांनी सुद्धा हे मोल लक्षात घेऊन पाण्याच्या समस्येवर मात करणारी एक अनोखी व इतरांना आदर्शवत कामगिरी करून दाखविली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.