दिलासादायक बातमी : नांदेड जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; मात्र गर्दी टाळा- डॉ. विपीन

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 369 एवढी झाली असून यातील 87 हजार 261 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
कोरोना मुक्तीकडे नांदेडची वाटचाल
कोरोना मुक्तीकडे नांदेडची वाटचाल
Updated on

नांदेड : जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 369 एवढी झाली असून यातील 87 हजार 261 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 702 रुग्ण उपचार घेत असून 15 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. एकंदरीत जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. परंतू जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या एक हजार 890 एवढी आहे. रविवारच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 26, कंधार एक, मुखेड एक, यवतमाळ एक, नांदेड ग्रामीण एक, किनवट तीन, नायगाव एक, परभणी एक, बिलोली एक, लोहा एक, उमरी तीन, देगलूर सात, माहूर एक, हिंगोली तीन तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 30, मुदखेड एक, नांदेड ग्रामीण 15, मुखेड दोन, किनवट एक, परभणी दोन, माहूर चार, हिंगोली एक असे एकूण 107 बाधित आढळले.

हेही वाचा - नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी, समारंभ, सोहळे चालणार नाहीत.

जिल्ह्यातील 141 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सात, मुखेड कोविड रुग्णालय दोन, लोहा कोविड रुग्णालय तीन, खाजगी रुग्णालय 25, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 93, किनवट कोविड रुग्णालय तीन, अर्धापूर तालुक्यांतर्गत चार, उमरी तालुक्यातंर्गत दोन, बिलोली तालुक्यातंर्गत एक, हदगाव कोविड रुग्णालय एक अशा व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

702 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल दोन, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 37, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर दोन, किनवट कोविड रुग्णालय 23, देगलूर कोविड रुग्णालय सात, हदगाव कोविड रुग्णालय चार, लोहा कोविड रुग्णालय दोन, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 334, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 218, खाजगी रुग्णालय 50 व्यक्ती उपचार घेत आहेत.

येथे क्लिक करा - कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 35 मृत्यू नोंदवण्यात आले.

कोरोना मिटर

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 58 हजार 64

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 56 हजार 253

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 369

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 261

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 890

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के

रविवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

रविवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-97

रविवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-263

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 702

रविवारी रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.