नांदेड : कोविड काळात नियमित रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेकरिता नांदेड रेल्वे विभाग 11 रेल्वे गाड्या चालवीत आहे, यात 3 विशेष गाड्या तर 8 उत्सव विशेष गाड्यांचा समावेश आहे. देशाच्या विविध भागात प्रवास करता यावा याकरिता या गाड्या उपयोगी पडत आहेत. या विशेष गाड्यांमुळे नांदेड विभागातून प्रवाशांना मुंबई, पनवेल, पुणे, दिल्ली, आग्रा, अमृतसर,सिकंदराबाद, पटना, तिरुपती, अमरावती, जयपूर, अजमेर, भिलवाडा, इटारसी, जबलपूर इत्यादी ठिकाणी प्रवास करणे शक्य होत आहे.
या विशेष गाड्या पुढील प्रमाणे आहेत –
ँ गाडी संख्या 12765 तिरुपती ते अमरावती (द्वी-साप्ताहीक) : दर मंगळवार आणि शनिवारी तिरुपती येथून दुपारी 15.10 वाजता सुटत आहे. काचीगुडा, नांदेडमार्गे अमरावती येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14.50 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता. 20 आॅक्टोंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान धावेल–या गाडी मध्ये जवळपास 50% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 12766 अमरावती ते तिरुपती (द्वी-साप्ताहिक) : दर गुरुवार आणि सोमवारी अमरावती येथून सकाळी 06. 45 वाजता सुटत आहे. अकोला, नांदेड, काचीगुडा मार्गे तिरुपती येथे सकाळी 06. 40 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता. 22 आॅक्टोंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान धावेल. या गाडीतही जवळपास 50% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 02720 हैदराबाद ते जयपूर (द्वी-साप्ताहीक) : दर मंगळवारी आणि गुरुवारी हैदराबाद येथून रात्री 20.35 वाजता सुटत आहे आणि नांदेड, अकोला, अजमेरमार्गे जयपूर येथे सकाळी 06.05 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता. 21 आॅक्टोंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत धावेल. या गाडीत जवळपास 20% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 02719 हैदराबाद ते जयपूर (द्वी-साप्ताहीक) : दर गुरुवारी आणि शुक्रवारी जयपूर येथून दुपारी 15.20 वाजता सुटून अजमेर, अकोला, नांदेड, मार्गे हैदराबाद येथे 00.45 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता. 23 आॅक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत धावेल. या गाडीत जवळपास 20% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07610 पूर्णा ते पटना (साप्ताहीक) : दर शुक्रवारी पूर्णा येथून सायंकाळी 18.10 वाजता सुटून नांदेड, आदिलाबाद, नागपूर, इटारसी, जबलपूर, पंडित दीनदयाळ उपाध्याय जं., आरामार्गे पटना येथे सकाळी 02.30 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता. 23 आॅक्टोंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत धावेल. या गाडीत जवळपास 50 % जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07609 पटना ते पूर्णा (साप्ताहिक) : दर मंगळवारी पटना येथून रात्री 23.10 वाजता सुटून आरा, सतना, जबलपूर, इटारसी, नागपूर, आदिलाबाद मार्गे पटना येथे सकाळी 07.10 वाकता पोहोचत आहे. ही गाडी ता. 25 आॅक्टोबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान धावेल. या गाडीस चांगला प्रतिसाद आहे.
ँ गाडी संख्या 07639 काचीगुडा ते अकोला (साप्ताहिक) : दर सोमवारी काचीगुडा येथून सकाळी 07.10 वाजता सुटून निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम मार्गे अकोला येथे सायंकाळी 18.30 वाजता पोहोचत आहे. ही गाडीता. 26 आॅक्टोंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 80 % जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07640 अकोला ते काचीगुडा (साप्ताहिक) : दर मंगळवारी अकोला येथून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि वाशीम, हिंगोली, पूर्णा, अकोला, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद मार्ग काचीगुडा येथे रात्री 20.15 वाजता पोहोचेल. या गाडीत जवळपास 80 % जागा शिल्लक आहेत. ही गाडी ता. 27आॅक्टोंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान धावेल.
ँ गाडी संख्या 07641 काचीगुडा ते नारखेर () : ही गाडी सोमवार वगळता रोज काचीगुडा येथून सकाळी 07.10 वाजता सुटून निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, मुर्तीजापूर, न्यू अमरावती मार्गे नारखेर येथे रात्री 23.10 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता. 23आॅक्टोंबर ते 29नोव्हेंबर दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 60% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07642 नारखेर ते काचीगुडा : ही गाडी मंगळवार वगळता रोज नारखेर येथून सकाळी 04.30 वाजता सुटून आणि वाशीम, हिंगोली, पूर्णा, अकोला, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद मार्ग काचीगुडा येथे रात्री 20.15 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता. 24आॅक्टोंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 60 % जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07614 नांदेड ते पनवेल : ही गाडी रोज सायंकाळी 17.30 वाजता हु.सा. नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटून परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद, कुरुदुवादी, दौंड, पुणे मार्गे पनवेल येथे सकाळी 09.00 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता. 23 आॅक्टोंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 45% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07613 पनवेल ते नांदेड : ही गाडी रोज सायंकाळी 16.00 वाजता पनवेल येथून सुटून पुणे, दौंड, कुरुदुवादी, उसमानाबाद, परळी, परभणी मार्गे नांदेड येथे सकाळी 09.25 वाजत पोहोचत आहे हे. ही गाडी ता. 24आॅक्टोंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 65% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07688 धर्माबाद ते मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस : ही गाडी रोज सकाळी 04.00 वाजता धर्माबाद येथून सुटत आहे, उमरी, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद मार्गे मनमाड येथे दुपारी 13.20 वाजता पोहोचात आहे. हि गाडी ता. 24 आॅक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 70% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07687 मनमाड ते धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस : ही गाडी रोज दुपारी 15.00 वाजता मनमाड येथून सुटून नगरसोल , लासूर, रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे धर्माबाद ला 00.10 वाजता पोहोचते. ही गाडी ता. 24 आॅक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान धावत आहे. या गाडीत जवळपास 70 % जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07049 हैदराबाद ते औरंगाबाद : ही गाडी हैदराबाद येथून रोज रात्री 22.45 वाजता सुटत आहे, विकाराबाद, बिदर, उदगीर, लातूर रोड, परळी, परभणी, जालना मार्गे औरंगाबाद येथे दुपारी 13.20 वाजता पोहोचेल. ही गाडी ता. 23 आॅक्टोबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 45 % जागा शिल्लक आहेत.
येथे क्लिक करा - परभणीत नळजोडणीसाठी नगरसेवक गतीमान
ँ गाडी संख्या 07050 औरंगाबाद ते हैदराबाद : हि गाडी औरंगाबाद येथून रोज दुपारी 16.15 वाजता सुटून जालना, परतूर, सेलू, परभणी, परळी, उदगीर, विकाराबाद मार्गे हैदराबाद येथे सकाळी 06.30 वाजता पोहोचेल. दिनांक 24.10.2020 ते 30.11.2020 दरम्यान धावेल. या गाडीत जवळपास 30% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07564 परभणी ते हैदराबाद : ही गाडी परभणी येथून रोज रात्री २२.30 वाजता सुटत आहे, नांदेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद मार्गे हैदराबाद येथे सकाळी 06.45 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता. 12 सप्टेंबरपासून सुरु आहे. या गाडीत 25% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 07563 हैदराबाद ते परभणी : ही गाडी हैदराबाद येथून रोज रात्री २२.45 वाजता सुटून निझामाबाद, बासर, नांदेड मार्गे परभणी येथे सकाळी 06.30 वाजता पोहोचत आहे. ही गाडी ता.12 सप्टेंबरपासून सुरु आहे. या गाडीत जवळपास 30% जागा शिल्लक आहेत.
ँ गाडी संख्या 01141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते किनवट मार्गे नांदेड - हि गाडी दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी 16.35 वाजतासुटून मनमाड, औरंगाबाद, नांदेड मार्गे किनवट येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 09.00 वाजता पोहोचत आहे. या गाडीस चांगला प्रतिसाद आहे.
ँ गाडी संख्या 01142 किनवट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मार्गे नांदेड- ही गाडी ता. 13 आॅक्टोबरपासून किनवट रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी 13.30 वाजता सुटून हुजूर साहेब नांदेड, औरंगाबाद- मनमाड मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 05.35 वाजता पोहोचत आहे. या गाडीस चांगला प्रतिसाद आहे.
ँ गाडी संख्या 02715 हु. सा. नांदेड ते अमृतसर–सचखंड एक्स्प्रेस: ता. 1 जूनपासून रोज सकाळी 09.30 वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटत आहे. परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, मार्गे अमृतसर येथे रात्री २२. 25 वाजता पोहोचत आहे. या गाडीस चांगला प्रतिसाद आहे.
ँ गाडी संख्या 02716 अमृतसर ते हु. सा. नांदेड सचखंड एक्स्प्रेस: ही गाडी ता. 3 जून 2020 पासून अमृतसर रेल्वे स्थानकावरून रोज सकाळी 05.30 वाजता सुटत आहे, दिल्ली, आग्रा, मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे सायंकाळी 16.00 वाजता पोहोचत आहे. या गाडीस चांगला प्रतिसाद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.