नांदेड : जिल्ह्यात (Nanded) मागील दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. रविवारी (ता.२६) सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. परिणामी विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने विष्णुपुरीचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, दोन हजार ५३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी (Govadavari River) पात्रात सोडण्यात येत आहे. संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. जिल्ह्यात ता.सहा व ता.सात सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हहाकार माजवला होता. अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाने काही दिवस थोडीशी विश्रांती घेतली होती. सध्या जिल्ह्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु असून शेतकरी (Rain) सोयाबीन काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात पावसाने हाहाकार केल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचे अद्याप पंचनामेही झालेले नाही. तोच पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
नांदेडमधील प्रकल्पात ८२.५७ टक्के पाणीसाठा
ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्प, केटीवेअरसह उच्च पातळी बंधार्यात एकूण ६१५.९४ दशलक्ष घणमीटरनुसार ८२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी या काळात जिल्ह्यात ७५ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात जूनमध्ये दमदार सूरवात केलेल्या पावसाने मध्यंतरी २२ दिवसाची उघडीप दिली होती. यामुळे पेरण्यांची कामे खोळंबली. यानंतर जुलैमध्ये मात्र पावसाने जोरदार सुरुवात करत मागची कसर भरुन काढली. दरम्यानच्या काळात काहीसा मंदावलेल्या पावसाने ऑगष्ट-सप्टेंबरमध्ये जोर धरला. या पावसामुळे जिल्ह्यात लहान-मोठ्या नंद्यासह नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर आला. या पावसामुळे खरिपातील लाखो हेक्टरवरील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
विष्णुपुरीची पाणीपातळी वाढली
पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प तुडूंब भरला असून प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दरवाजामधून दोन हजार ५३२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शनिवारी (ता.२५) चार दरवाजे उघडल्यानंतर रविवारी (ता.२६) सकाळी पुन्हा पाचवा दरवाजा उघडण्यात आला. सद्यस्थितीत विष्णुपुरीची पाणीपातळी ३५४.२० मीटरवर पोहचली असून ८४.६१ टक्के पणीसाठा उपलब्ध झाला आहे.
प्रकल्पनिहाय पाणीसाठा
प्रकल्प...............दलघमी...............टक्केवारी
विष्णुपुरी.............८४.६१................१००
मानार................१३८.२१...............१००
मध्यम प्रकल्प (९).......१३७.३६.........९८.७७
लघू प्रकल्प (८८).............१८१.०४............९४.९४
उच्चपातळी बंधारे (९)..........७८.५३..........४१.३६
जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
जिल्ह्यासाठी सोमवारी (ता.२७) आणि मंगळवारी (ता.२८) असे दोन दिवस आॅरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.