नांदेड : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सात वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विष्णुपूरी येथील डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवार (ता. 30) रोजी जिल्हाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझर वाटप करुन कोवीड योध्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ. संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने या कार्यक्रमात मास्क, सॅनिटायझरचे वाटप व कोविड योध्यांचा सत्कार करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सात वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल देशभरात भाजपच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नांदेड येथेही विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाच्या संकटकाळात काम करणाऱ्या कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - हॉस्पिटलकडून सर्व बिल माफ करून परिसरात एक आदर्श निर्माण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षात समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना राबविल्या, त्यामुळे ख-या अर्थाने केंद्रातील सरकार हेच जनतेचे सरकार आहे, असे प्रतिपादन खा. चिखलीकर यांनी यावेळी केले. अन्य कोण्या पक्षाचा पंतप्रधान असता आणि त्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असता तर त्यांच्या पक्षाने आतीषबाजी करून आनंदोत्सव सादरा केला असता परंतु कोरोनासारख्या संकटाच्या काळात पक्ष कार्यकर्त्यांनी केवळ समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची भूमिका भाजपने घेतली, अशा शब्दात खा. चिखलीकर यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळत काँग्रेसवर टीका केली.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक डाॅ. संतुकराव हंबर्डे, महानगराध्यक्ष प्रवीण साले, मनपा विरोधी पक्षनेता दीपकसिंह रावत, डाॅ. अजित गोपछडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय पाटील घोगरे तसेच मोतीराम पाटील, डाॅ. शीतल भालके, प्रभू पाटील कपाटे, शततारका पांढरे, लोकडोजी पाटील, गजानन उबाळे, धीरज स्वामी, रुपेश व्यास, संतोष कदम जाणापुरीकर, व्यंकटेश जिंदम, धीरज स्वामी, कामाजी पाटील मरळककर, अश्विनी महल्ले, वैशाली देबडवार, अनुराधा गिराम, वंदना हैबते, डॉ. बालाजी गिरगावकर शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. वाय. एस. चव्हाण, प्रशासकीय अधिकारी श्री बालाजी डोळे , रामा लुटे, पांडुरंग कंपले आदींची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.