निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या वरुला महाताळा (ता. हदगाव) या गट ग्रामपंचायतचे उपसरपंच अविनाश बंडू भोयर (वय २५) यांचा मंगळवारी (ता. २२) सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला. तपासणी दरम्यान गळा आवळल्यामुळे व मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले असून हा आकस्मिक मृत्यू नसून खून असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अविनाश भोयर हे वरुला महाताळा गट ग्रामपंचायतचे उपसरपंच होते. मागील वर्षी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत त्यांच्या गटाने विजय मिळविला होता. वरुला येथील पोलीस पाटील गणेशराव भोयर यांचा पुतण्या अविनाश बंडू भोयर हा कालपासून कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेला होता. रात्री परत आला नाही. त्यानंतर कोणीतरी अविनाश यांच्या वडिलांना फोन करून सांगितले की, तुमच्या मुलाचा मृतदेह कोळी आणि तळणी दरम्यान असलेल्या माळरानात टेकडीच्या बाजूला आढळून आला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी जाऊन तो मृतदेह ताब्यात घेतला. परंतु घरी आल्यानंतर मृतदेहाची तपासणी केली असता पाठीवर व अनेक ठिकाणी दोरीने वायरने मारल्याचे व्रण दिसून येत होते. त्या ठिकाणी रक्त आले होते. तसेच गळ्यावर आवळल्याचा व्रण दिसून येत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले.
पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पोलिस उपनिरिक्षक संगीता कदम व पोलिस उपनिरीक्षक गोविंद खैरे यांना चौकशीकामी पाठवले. हे प्रकरण वरिष्ठाला कळविल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रांजणकर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासिक अंमलदार यांना मार्गदर्शन केले. हा घातपाताचा प्रकार असावा, असा कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ तसेच रासायनिक विश्लेषक यांची मदत घेऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी मयताच्या गळ्याला आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे निरिक्षण नोंदवले असल्याचे पोलिसांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.