अर्धापूर तालुका जलमय; तिन्ही मंडळात अतिवृष्टी, दोघांचा जीव वाचवण्यात यश

एनडीआरफच्या मदतीने पुरात अडकलेल्यांची सुटका
Nanded Rain News
Nanded Rain Newsesakal
Updated on

अर्धापूर (जि.नांदेड) : तालुक्यातील तिन्ही मंडळात अतीवृष्टी झाल्याने अवघा तालुका जलमय झाला आहे. नदीनाल्यांना पुर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला, तर बामणी शिवरात अडकलेल्या झारखंडमधील दोघांना एनडीआरएफच्या मदतीने सुटका करण्यात आली. तालुक्यातील शेती खरडून गेल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. शहरातील सखल भागात पाणी शिरले. तालुक्यातील तिन्ही मंडळात सरासरी १०४ मिलिमीटर पाऊस (Rain) झाला आहे. यात अर्धापूर मंडळ ११२, दाभड ११८, तर मालेगाव मंडळांत १०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून सर्व विभाग सतर्क झाले आहेत. (Heavy Rain Hit Ardhapur Taluka, Two People Rescued By NDRF In Nanded)

Nanded Rain News
हिंगोली : कुरुंदा येथे मुसधार पाऊस : जलेश्वर नदीचे पाणी अनेकांच्या घरात

तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने तालुका जलमय झाला. तालुक्यातील लोणारी नदी, मेंढलानाला, आसना नदी, कोंढा नाल्यासह सर्वच नदीनाल्यांना पूर आला. खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असतानाच अतिवृष्टी झाल्याने पिके मोडक्यात व बाल्यावस्थेत असतानाच वाहून गेली. शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात वाहून गेले आहे. तालुक्यातील बामणी शिवारातील पाण्याच्या टाकीच्या मागे झारखंड राज्यातील दोन नागरिक अडकले होते. त्यांच्या मदतीला नांदेड (Nanded) जिल्हा प्रशासन धावून आले.

Nanded Rain News
नांदेड : जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ११.६० मिलिमीटर पाऊस

या अडकलेल्या लोकांना एनडीआरएफच्या मदतीने सुटका करण्यात आली. या मदत कार्यावर जिल्हाधिकारी डॉ विपीन इकनकर, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, पोलिस निरीक्षक अशोक जाधव, नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी लक्ष ठेवून नागरिकांचे प्राण वाचवले. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. शहरातील वार्ड क्रमांक एक मधील दुर्गानगर भागातील घरात नेहमी प्रमाणे पाणी शिरले. नगरपंचायत प्रशासनाने पाहणी केली. या भागातील ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून असुन अशा घटना वारंवार घडत असल्याने कायम स्वरुपी उपाय योजना करण्यात अद्याप प्रशासनाला जाग आली नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी शहरातील विविध भागात पाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.