नांदेड : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारपासून (ता.२७) जिल्ह्यामध्ये (Rain In Nanded) संततधार सुरु आहे. परिणामी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नांदेड शहरातील सखल भागासह संपूर्ण जिल्हा जलमय झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान उमरखेड तालुक्यात नांदेड-नागपूर बस पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पवसाचा जोर वाढला आहे. संततधार पावसामुळे शेतातील उभे पिकांचे मोठे नुकसान सुरु आहे. सध्या सोयाबीन काढणीचे काम सुरु असून, काढलेले सोयाबीन (Soybean) पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेले आहे. सोमवारी दिवसभर (Nanded) संततधार सुरु होती. रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. त्यामुळे नांदेड शहरातील वसंतनगर, दत्तनगर, श्रीनगर, तरोडा, मालेगाव रोडवरील आरा मशीनसह शहराच्या इतरही सखल भागामध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे मंगळवारी सकाळी बघायला मिळाले.
नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. वाहतुक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प झालेली आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नांदेड आगारातून निघालेली नागपूर डेपोची नांदेड-नागपूर बस उमरखेड-पुसद रस्त्यावरील पैनगंगा नदीच्या पुलावरून वाहून गेली आहे. या बसमध्ये किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप मिळालेली नसून, ग्रामस्थांच्या वतीने मदतकार्य सुरु आहे.
गोदावरीला दुसऱ्यांदा पूर
विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पात येवा वाढला आहे. परिणामी प्रकल्पाच्या नऊ दरवाजातून पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडण्यात येत आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गोदावरीला पूर आला असून, गोवर्धनघाटही पूर्णपणे दुसऱ्यांदा पाण्यात गेला आहे. नगिनाघाटचा गुरुद्वाराही पाण्यात गेला आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अनेकजण सेल्फी काढण्यात व्यस्त असल्याचे दिसून आहे.
प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा
गोदावरीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.