Nanded Lok sabha : नांदेड लोकसभा मतदारसंघातील नांदेड उत्तर विधानसभेमध्ये सर्वात जास्त तर भोकरमध्ये सर्वात कमी मतदार आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रात सर्वात जास्त केंद्र मुखेडला तर सर्वात कमी नांदेड दक्षिणला आहेत.
नांदेड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काही उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. प्रचारसभांसह कॉर्नर बैठका, प्रचारफेरी सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात २३ उमेदवार शिल्लक असून त्यामध्ये दहा राजकीय पक्षाचे तर १३ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
प्रताप पाटील चिखलीकर (भाजप), वसंतराव चव्हाण (कॉँग्रेस), ॲड. अविनाश भोसीकर (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह इतर २३ उमेदवार तसेच त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आता प्रचाराला लागले आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर आणि मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. एकूण मतदार १८ लाख ५१ हजार ८४३ आहेत. त्यात पुरूष मतदार नऊ लाख ५५ हजार ८४, महिला मतदार आठ लाख ९६ हजार ६१७ तर अन्य मतदार १४२ आहेत.
सर्वात जास्त मतदार नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी मतदार भोकर विधानसभा मतदारसंघात आहेत. नांदेड उत्तरमध्ये सर्वात जास्त म्हणजेच शंभर अन्य मतदार आहेत. नांदेड शहराचा नांदेड दक्षिण आणि उत्तरमध्ये भाग येतो.
नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार ६२ मतदान केंद्र असून सर्वात जास्त मुखेड विधानसभा मतदारसंघात ३६२ मतदान केंद्राची संख्या आहे.
हा मतदारसंघ मोठा आणि डोंगराळ भागात आहे. तर सर्वात कमी मतदान केंद्र नांदेड दक्षिणमध्ये ३१२ आहेत. नांदेड दक्षिणचा भाग हा दाट लोकवस्तीमध्ये मोडतो.
नांदेड लोकसभा मतदारसंघ (ता. चार एप्रिलपर्यंतची यादी)
मतदारसंघाचे नाव - पुरुष - महिला - अन्य - एकूण मतदान केंद्रे
भोकर विधानसभा - १,५१,१५४ - १,४३,२४९ - सहा - २,९४,४०९ ३४३
नांदेड उत्तर - १,७८,४७७ - १,६८,३०९ - शंभर - ३,४६,८८६ ३४८
नांदेड दक्षिण - १,५८,६१७ - १,५०,१६९ - चार - ३,०८,७९० ३१२
नायगाव - १,५५,२८२ - १,४६,००७ - दहा - ३,०१,२९९ ३४९
देगलूर - १,५६,३७१ - १,४७,५५८ - चौदा - ३,०३,९४३ ३४८
मुखेड - १,५५,१८३ - १,४१,३२५ - आठ - २,९६,५१६ ३६२
एकूण- ९,५५,०८४ - ८,९६,६१७ - १४२ - १८,५१,८४३ २०६२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.