नांदेड : सव्वातीन हजारांपैकी ६६ बाधितांवर रुग्णालयात उपचार

बुधवारी ७५८ अहवाल पॉझिटिव्ह; ४७४ रुग्ण कोरोना आजारातून मुक्त
Corona
Corona sakal
Updated on

नांदेड : जिल्हाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी, सध्या पॉझिटिव्ह (Covid-19 positive) असलेल्या तीन हजार ३८३ बाधितांपैकी तीन हजार ३१७ जणांवर नांदेड(Nanded) महापालिकेच्या गृहविलगीकरण व जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणात उपचार सुरु आहेत. तर विष्णुपुरी शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, हदगाव, बिलोली शासकीय कोविड सेंटर(Covid-19 Center)मिळुन केवळ ६६ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

Corona
अर्धापूर नगरपंचायतीत काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेवर, दिग्गजांचा पराभव

बुधवारी (ता.१९) प्राप्त झालेल्या दोन हजार २११ अहवालापैकी ७५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ९५ हजार ४१३ इतकी झाली आहे. आतापर्यंत ८९ हजार ३७४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. विष्णुपुरी शासकीय रुग्णालयाच्या कोविड सेंटर मध्ये उपचार सुरु असलेल्या गंभीर रुग्णांपैकी बुधवारी किनवट तालुक्यातील सावरगाव येथील एका ५४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांपैकी मृत्यू झालेल्यांची संख्या दोन हजार ६५६ इतकी झाली आहे.

बुधवारी दिवसभरात नांदेड वाघाळा महापालीका क्षेत्रात ४६७, नांदेड ग्रामीण ७०, धर्माबाद २०, लोहा २६, उमरी चार, मुदखेड २१, कंधार १४, बिलोली तीन, मुखेड २२, नायगाव चार, हदगाव तीन, देगलूर दोन, किनवट ३७, भोकर एक, माहूर १४, अर्धापूर दोन, अमरावती सहा, उमरखेड एक, नंदूरबार एक, अकोला एक, लातूर एक, परभणी १३, हिंगोली १४ व हैदराबाद सात असे ७५८ बाधित आढळुन आले आहेत. दुसरीकडे दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील १२, नांदेड वाघाळा महापालीकेच्या गृहविलगीकरणातील ४२०, तालुक्यातील गृहविलगीकरणातील ३७ व खासगी रुग्णालयातील पाच असे ४७४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले.

Corona
नांदेड : जिल्ह्यात ४५१ व्यक्ती कोरोनाबाधित

सध्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालय कोविड सेंटर ३३, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात आठ, नांदेड महापालिका गृहविलगीकरणात दोन हजार ५६०, तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणात ७५७, हदगाव कोविड सेंटर एक, बिलोली कोविड सेंटर दोन व खासगी कोविड सेंटरमध्ये २२ असे एकूण तीन हजार ३८३ रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यापैकी तीन बाधितांची प्रकृती गंभार आहे.

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण पॉझिटिव्ह - ९५ हजार ४१३

  • एकूण कोरोनामुक्त - ८९ हजार ३७४

  • एकूण मृत्यू - दोन हजार ६५६

  • बुधवारी पॉझिटिव्ह - ७५८

  • बुधवारी कोरोनामुक्त - ४७४

  • बुधवारी मृत्यू - एक

  • उपचार सुरु - तीन हजार ३८३

  • अतिगंभीर प्रकृती - तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.