Wild Vegetables : अगं ऐकलंस का... तूही रानभाज्याच घे! गृहिणी देताहेत एकमेकींना बचतीचा सल्ला

बाजारात महागलेल्या भाज्यांऐवजी आता गृहिणी आता रानभाज्यांना पसंती देत असल्याचे पहावयास मिळत आहे.
Wild Vegetables
Wild Vegetablessakal
Updated on

देवगावफाटा - बाजारात महागलेल्या भाज्यांऐवजी आता गृहिणी आता रानभाज्यांना पसंती देत असल्याचे पहावयास मिळत आहे. लांबलेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन भाज्या महागल्या आहेत. परंतु पावसाळ्यात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या रानभाज्यांना मागणी वाढली आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की आठवडाभरात रानभाज्या बाजारात दाखल होतात. वर्षातून फक्त दोन महिने मिळणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी गरीब, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू घरातीलसुद्धा लोकांचा कल असतो. शाकाहाराबरोबरच मांसाहारी लोकही या भाज्या आवर्जून खरेदी करताना दिसतात.

हातावर पोट असणाऱ्यां व वर्षभर गावठी भाजी विकणाऱ्यांसाठी तर हा काळ पर्वणी ठरतो. निसर्ग स्वत:च ही भाजी पिकवून देत असल्यामुळे कोणताही खर्च न करता केवळ कष्टाने भाजी मिळवून ती बाजारात आणावी लागते. या रानभाज्या औषधी व गुणकारी असल्याने त्या खरेदीसाठी खवय्यांची मोठी झुंबड उडत असते.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने शेतात व माळरानावर विविध औषधी भाज्या उगवतात. शेवळे, टाकळा, कोळा, भारंगा, कंटोळी, कुडी, आकूर, कुलू आदी औषधी व गुणकारी भाज्या अनेकांना रोजगार मिळवून देतात. या भाज्यांना बाजारात मागणी देखील मोठ्या प्रमाणावर असून या विक्रीतून दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळून देत असल्याचे भाजी विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

बाजारात दाखल झालेल्या रानभाज्या

करटुली, कुड्याची फुले, कुरडू, आंबटवेल, भोपळा पाने, इकरा, अंबाडा फळे, माठ देठ, कवळा, आघाडा, टाकळा, कोरड, चिवळी, चिंचुरडा, शेवाळी, मोखा, रानकेळी, चिंचुरडा, शेवाळी, फोडशी, कोरलं, वाघोटी, टेरी, भोपर, भुईछत्री, रानकेळी, चायवळ, ससेकान, नारेली, इकरा, आळू, कवट, चिघळ घोळ, बिट अशा अन्य पालेभाज्या आणि फळ वर्गातील इतर रानभाज्या विक्रीस आल्या आहेत.

आम्ही दरवर्षी या रानभाज्या रानोमाळ फिरून आठवडी भरणाऱ्या बाजारात घेऊन येतो. या भाज्यांचे विशेष म्हणजे इतर भाज्या लवकर खरेदी केल्या जात नाहीत. पण रानभाज्या लवकर विकल्या जातात. तसेच काही ग्राहक आवर्जून या भाज्या घेऊन या असे सांगतात.

- राधाबाई मस्के, भाजी विक्रेती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.