जमिनीच्या वादातून पती- पत्नीचा खून

download (2).jpg
download (2).jpg
Updated on


वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः माहूर तालुक्यातील जुनापाणी येथील पती-पत्नीस त्याच्या भावकीतील लोकांनी जमिनीच्या वादातून बळजबरीने विष पाजवून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात त्यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलिस ठाण्यात नऊ आरोपी विरोधात आत्महत्या चिथावणी देणे, खुनाचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, माहूर तालुक्यातील जुनापाणी येथील रहिवासी बंडू मिसू राठोड त्यांची वडिलोपार्जित हिश्याने आलेली पाच एकर जमीन जुनापणी व वाई बाजार येथे स्वकष्टाने घेतलेली चार एकर जमीन आहे. या जमिनीमध्ये समसमान हिस्सा वाटून देण्याच्या कारणावरून भावकीत नेहमी खटके उडायचे. यामुळे मागील वीस दिवसांपूर्वी सदर प्रकरण समाजातील पंचासमक्ष येऊन तोडगा काढण्यासाठी बैठकही घेण्यात आली होती. परंतु, या बैठकीत कसल्याही स्वरूपाचा समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. (ता.दहा) जून रोजी सकाळी सातच्या सुमारास खंडू मिसू राठोड, राजेश मिसू राठोड, बेबीबाई खंडू राठोड, प्रियंका राजेश राठोड, कांताबाई मिसू राठोड, संजय मिसू राठोड, निखील खंडू राठोड, निकिता खंडू राठोड व पांडू मिसू राठोड यांनी माझ्या आई-वडिलांना मारहाण करत जबरदस्तीने विष पाजले व अंगावर विष ओतल्याचे फिर्यादी मुलीचे म्हणजे आहे.

बंडू राठोड व त्यांच्या पत्नी यांना विष पाजल्यानंतर त्यांच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करून यवतमाळ येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारार्थ नेण्यात आले. आई यशोदाबाई बंडू राठोड व वडील बंडू राठोड यांना आयसीयूमध्ये उपचार चालू असताना (ता. १६) जून रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास बंडू मिसू राठोड यांची प्राणज्योत मालवली. या घटनेवरून फिर्यादी कुमारी हुमानी बंडू राठोड हिच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी खंडू मिसू राठोड, राजेश मिसू राठोड, बेबीबाई खंडू राठोड, प्रियंका राजेश राठोड, कांताबाई मिसू राठोड, संजय मिसू राठोड, निखील खंडू राठोड, निकिता खंडू राठोड व पांडू मिसू राठोड यांच्याविरुद्ध बुधवारी (ता.१७) रात्री पावणेदोनच्या सुमारास सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड व उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर हे करीत आहेत.

जमिनीच्या मालकीवरून सख्खे भाऊ भिडले
घटनेचा तपास पोलिस करत असतानाच आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास यशोदाबाई बंडू राठोड हेदेखील मरण पावल्याची माहिती हाती आली. (ता.दहा) जून पासून आजपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींतील दाखल गुन्हांच्या अनुषंगाने पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी खंडू मिसू राठोड व राजेश राठोड यांना अटक केली आहे. एकंदरीत या घटनेचे वास्तव पाहता जमिनीच्या मालकीवरून सख्खे भाऊदेखील कुठल्याही निर्णयाप्रत पोचू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.