नांदेड - आपल्याला सध्या सर्वत्र कोरोना कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. परंतु जगामध्ये काही देशात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनाविषयी जाणून घेऊन खबरदारी नाही घेतली तर महामृत्यू तांडव होईल, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दि. भा. जोशी यांनी व्यक्त केली.
संस्कार भारतीच्या नांदेड शाखेतर्फे आयोजित ‘कोरोनातून सावरताना’ या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात जनजागृती करताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दि. भा. जोशी बोलत होते. आपण आता योग्य काळजी घेतली नाही तर यापूर्वी शंभर वर्षांपूर्वी आलेल्या इन्फ्लुइंझा रोगाप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भयंकर मनुष्यहानी होईल, असे सांगून डॉ. जोशी म्हणाले की, सध्या कोरोना लहरीपणाने वागत आहे. कारण ३० वर्षाचा धडधाकट व्यक्तीचा मृत्यू होतो आणि ८० वर्षाचा रुग्ण बरा होऊन घरी येत आहे.
हेही वाचा - गुड न्यूज : नांदेड- अमृतसर विमानसेवा दहा नोव्हेंबरपासून
अद्यापपावेतो खात्रीची उपाययोजना नाही
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दि. भा. जोशी यांनी कोरोना विषाणूचा चीन पासूनचा उगमाचा इतिहास सांगून जगभरातील प्रसार कसा झाला ते सांगितले. त्यानंतर भारतात त्याची लागण होऊन प्रसार कसा झाला व त्यास रोखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातून कशा प्रकारे उपाययोजना झाल्या, यावर प्रकाश टाकून अद्यापपावेतो शंभर टक्के खात्रीची उपाय योजना सापडली नसल्याचे सांगत जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाच्या लसी साठी एकमेकात समन्वय साधत संशोधन सुरू असल्याचे सांगितले.
असा होतो कोरोनाचा संसर्ग
कोरोना विषाणूची रचना कशी आहे हे सांगून हा निर्जीव असणारा विषाणू मानवी पेशीच्या संपर्कात आल्यावर सक्रिय होऊन माणसाच्या श्वसन यंत्रणेवर आरंभी हल्ला करून फुफ्फुसापर्यंत जातो व गुंतागुंतीची प्रक्रिया निर्माण करतो. ज्या वेळेस नाकाच्या ग्रंथीतून हजारो लाखो विषाणू निर्माण करून अशा बाधित व्यक्तीच्या शिंकण्यातून एका वेळी हजारोच्या संख्येने विषाणू बाहेर पडतात. हे विषाणू ज्यावर पडतात त्या पृष्ठभागावर काही ठराविक वेळ जीवंत राहतात व योग्य मानवी मुखाची जागा मिळाली नाही तर नष्ट होतात. हे जिवाणू खुल्या वातावरणात व उष्णतेमुळे नष्ट होतात. त्यामुळे सकाळच्या उन्हात फिरणे व निसर्गात खुल्या वातावरणात फिरले पाहिजे तसेच गैरसमजुतीने निसर्गात जाणे टाळू नये, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचलेच पाहिजे - तलाठी असलेल्या बापाने पुसले लेकीचे कुंकू : असे काय होते कारण ?
दुसरी लाट देशासाठी महामारीच
डॉ. जोशी यांनी आपल्या सुरक्षेसाठी मास्क कसे कार्य करतो व त्याचे योग्य असणारे प्रकार कोणते याबाबत प्रात्यक्षिक दाखवले. लस सापडेपर्यंत मात्र सर्वसामान्य जनतेने दोन गज अंतर, तोंडावर मास्क व वारंवार हात धुणे हे अंगीकारलेच पाहिजे. पण अजूनही दुर्दैवाने लोक सार्वजनिक समाजजीवनात बेजवाबदरीने वागत आहेत, असे चित्र दिसून येत आहे. भारतातील लोक जबाबदारीने वागले नाही तर कोरोनाची दुसरी लाट आपल्या देशासाठी मोठी महामारीच असेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शेवटी कोरोना आणि लॉकडाउनमुळे ठप्प झालेले व्यवहार, बंद पडलेले कलावंतांचे व सर्वसामान्यांचे रोजगार यामुळे समाजीवन व मानसिकता बिघडून गेली आहे. अशा वेळी या संकटात असणाऱ्या लोकांना मदतीचा हात दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.