चिमुकल्या हातांनी रेखाटले पर्यावरणाचे महत्व

NND05KJP01.jpg
NND05KJP01.jpg
Updated on

नांदेड : ग्लोबल वॉर्मिंग,  प्रदूषण,  वातावरणातील बदल, जागतिकीकरण, शहरातील गुदमरलेला श्वास, रसायनाचा अतिरेकी वापर वृक्षतोड यातून निसर्ग वाचविण्याचा संदेश लहान मुलांनी आपल्या चित्रातून देण्याचा प्रयत्न केला. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्पर्धा
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने नांदेडच्या अभिनव भारत जनविकास प्रतिष्ठान संस्थेने शालेय विध्यार्थ्यांसाठी एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकृतीच्या माध्यमातुन व्यक्त होण्याबाबत विध्यर्थ्यांना आवाहन केले होते. अनेक चिमुकल्यानी चित्र रेखाटून त्यांना त्यांचा निसर्ग कसा पाहिजे किंवा निसर्गाच्या मानवाकडून काय अपेक्षा आहेत हे मुलांनी सांगण्याचा प्रयत्न केला. 

कोरोनाचा संदर्भही चित्रातून समोर
त्याचबरोबर सध्याच्या कोरोनाचा संदर्भही अनेक मुलांच्या चित्रातून समोर आला आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे संपूर्ण मानवच संकटातच सापडल्याचे चित्र आहे. त्यालाही या लहान मुलांनी चित्रांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. श्री विद्यानिकेतन पब्लिक स्कुल आणि स्वामी विवेकानंद स्कुल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या शंभरहुन अधिक मुलांनी यात सहभाग नोंदवला होता.

ऑनलाईन चित्रकलेतून पर्यावरणाचे महत्व
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पाठविलेल्या चित्रकलेतून पर्यावरणाचे महत्व अधोरेखित केले. कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील याबाबत सांशकता असली तरी वरील शाळेने मागील काही दिवसापासून ऑनलाइन शिक्षण सुरू केले असून पालकांचा आणि विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मानवाचे जीवन संकटात सापडल्याच्या भावना  मुलांनी चित्रातून रेखाटण्याचा प्रयत्न केला आणि हे  संकट वेळीच ओळखून आता तरी आपण पर्यावरणाबाबत जागरूक झालो पाहिजे असा संदेश मुलांनी दिला आहे. 

मुलांनाही काहीतरी सांगायचंय
या चित्रातून मुलांनाही काहीतरी सांगायचंय. निसर्ग मानवाचा खरा मित्र असून निसर्गाला सांभाळायची जबाबदारी आपलीच असल्याचे मुलांनी आपल्या इवल्याश्या हातानी चित्रकृतीतून रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रकला स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट करताना शाळा ही मुलांना निसर्गाच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करते, ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे संगोपन करते त्याच प्रकारे निसर्ग ही मानवासाठी आईच्याच भूमिकेतून काम करतो मात्र भौतिक सुखाच्या मोहापायी आपणच निसर्गाच्या मुळावर उठलो असून पर्यावरणाचे संतुलन राहिले तरच आपले भविष्य सुरक्षित राहील हे अधिरेखीत करण्यासाठी ही चित्रकला स्पर्धा घेतली असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा शितल पांडे यांनी सांगितले. 

उत्कृष्ट चित्रांना पुरस्कार देणार 
मुलांच्या या कलाकृतीतून त्यांना ही काही सांगायच आहे, ते ही आपण समजून घेतलं पाहिजे अस सांगून यातील उत्कृष्ट चित्रांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याचे सांगितले. या चित्रकला स्पर्धेसाठी विद्यानिकेतन पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका पल्लवी निळेकर, गीता शर्मा, स्वाती चौधरी, सचिन  इसादकर, आकाश भोरे यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.