नांदेड : शहर व जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रतिबंध बसावा, सर्व सामान्य नागरिकांचा संसार सुखाने चालावा यासाठी मटका, जुगार, दारु आदी अवैध धंदे बंद करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न केले जातात. मात्र स्थानिक शासकिय यंत्रणेच्या 'अर्थ'पूर्ण व्यवहारातून हे धंदे राजरोसपणे सुरु आहेत. हे पोलिस व महसुलच्या कारवायावरुन स्पष्ट दिसून येत आहे. एकंदरीत वाळू, माती, मुरुम या गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला महसुल तर शहरासह जिल्हाभरात मटका, जुगार, अवैध देशी दारु, हातभट्टी या धंद्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील हे सर्वसामान्य नागरिकांना बरबाद करणारे गोरखधंदे बंद करावे अशी मागणी पुढे येत आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. विपीन हे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वाळू माफियांचे कर्दनकाळ ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाळू घाटावर मोठी कारवाई केली. त्यासाठी त्यांना गोपनियता पाळावी लागली. नसता महसुलची स्थानिक मंडळीने वाळू माफियांना सतर्क करण्यास मागेपुढे पाहिले नसते. त्याच धरतीवर पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आपल्या विभागाच्या वतीने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी नाकाबंदी व धरपकड मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. तरीही मटका जुगाराने आपले डोके वर काढले आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे (corona) निर्माण झालेल्या परिस्थितीला आता प्रत्येक जण कंटाळला आहे.
जिल्ह्यात झन्ना- मन्ना आणि तिर्रट जुगार तसेच मार्निंग नावाचा मटका पुन्हा सुरु झाल्याच्या घटना पोलिसांच्या कारवाईवरुन दिसून येत आहेत. नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिसनिरीक्षक करीम पठाण यांनी तिन दिवसांपूर्वीच कृष्णूरच्या पंचताारांकीत एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या जुगारावर छापा टाकून मोठी कारवाई २३ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता.
ही घटना ताजी असतानाच भोकर तालुक्यात रेणापुर शिवारामध्ये विनापरवाना बेकायदेशीररत्या झन्ना- मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती फौजदार अनिल कांबळे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याठिकाणी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरुन भोकर पोलिस ठाण्यात मटका जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री डेडवाल करत आहेत.
दुसऱ्या कारवाईत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाजेगाव ते मुदखेडला जाणाऱ्या रस्त्यावर एका घराशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानावर मॉर्निंग नावाचा मटका सुरु होता. तेथे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करुन नगदी सहा हजार तीनशे रुपये व काही आरोपींना अटक केली. पोलिस अंमलदार संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तिसऱ्या कारवाईत धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी शिवारात असलेल्या तळ्याच्या कट्ट्याजवळ बाभळीच्या झाडाखाली तिर्रट नावाचा जुगार सुरु होता. या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करुन नगदी सोळाशे रुपये व जुगाराचे साहित्यासह आरोपींना अटक केली. सहाय्यक पोलिस फौजदार साहेबराव नल्लेवाड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार श्री कदम करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.