Independence Day : माहूर ‘तहसील’ला ध्वजारोहणाचा विसर...

जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर आवाहन करून उपरोक्त तीन दिवसांच्या कालावधीत प्रत्येक शासकीय कार्यालयात अनिवार्यपणे राबविण्यात यावे असे आदेश काढले होते,
Independence Day
Independence DaySakal
Updated on

Independence Day - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त आणि भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने हर घर तिरंगा' हे अभियान नांदेड जिल्हयात ता.१३,१४ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्मित केले.

Independence Day
Mumbai News : तुम्हीच देखरेख ठेवा, आमचा वेळ का घालवता? खड्ड्यांवरून हायकोर्टाचे राज्यावर ताशेरे

त्या आदेशाच्या अनुषंगाने माहूर तालुक्यातील तहसील कार्यालय अपवाद वगळता इतर शासकीय,निमशासकीय कार्यालय,निवासी इमारती,व्यापारीक व औद्योगिक प्रतिष्ठानामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

मात्र,तालुक्याचे मुख्य प्रशासकीय कार्यालय असलेल्या तहसील कार्यालयाला मुख्य प्रशासकीय ध्वजारोहणाचा विसर पडल्याने आज (ता.१३) रोजी तहसील कार्यालयात व तहसील कार्यालयाच्या वतीने ऐतिहासिक रामगड किल्ल्यावरील मुख्य ध्वज स्तंभावर तिरंगा फडकला नाही.

Independence Day
Pune Crime : पुण्यात NIA ची मोठी कारवाई; ISISशी संबंधित एकाला अटक

जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर आवाहन करून उपरोक्त तीन दिवसांच्या कालावधीत प्रत्येक शासकीय कार्यालयात अनिवार्यपणे राबविण्यात यावे असे आदेश काढले होते,तत्पूर्वी राज्य शासनाकडून ही हर घर तिरंगा अभियानांतर्गत ता.१३,१४ व १५ ऑगस्ट अशा तीन दिवस नियमित ध्वजारोहण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

असे असताना माहूर तहसील कार्यालयातील मुख्य आणि तहसील कार्यालयाच्या वतीने ऐतिहासिक रामगड किल्ल्यावरील मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण आज करण्यात आले नाही.

तहसील कार्यालय इमारत परिसराची पाहणी केली असता प्रशासकीय इमारतीवर पंचायत समितीच्या वतीने ध्वजारोहण केल्याचे आढळून आले शिवाय मुख्य झेंड्याच्या बाजूला अनेक ठिकाणी छोटे तिरंगा ध्वज लावल्याचे दिसून आले.

Independence Day
Pune News : लॅम्बोर्गिनी खाली चिरडलेल्या 'डॉन'साठी गुडलक चौकात होणार शोकसभा; वंसत मोरे म्हणतात, "याला धडा शिकवणार..."

मात्र,तहसील कार्यालयाच्या आवारातील मुख्य आणि ऐतिहासिक रामगड किल्ल्यावरील धजस्तंभावर आज तिरंगा फडकला नाही.याविषयी आमच्या बातमीदाराने तहसीलदार किशोर यादव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी वर कॉल घेण्याचे टाळले.

सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारे माहूरचे वादग्रस्त तहसीलदार किशोर यादव यांची खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक ठिकाणी खरडपट्टी काढली होती.त्या नंतर भोगवटादार वर्ग दोन जमीन प्रकरणाच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (ता.३) ऑगस्ट रोजी औचित्याच्या मुद्द्यावर माहूर तहसीलदारांची वादग्रस्त कार्यपद्धती अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत मांडली होती.

या सर्व घटना नंतर तहसीलदार किशोर यादव यांची तातडीने हकलपट्टी केली जाईल अशा तर्क वितर्कांना उधाण आले होते,परंतु त्यांच्यावर अद्याप तरी कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिकच बडावला असून आज शासन आदेश धुडकावून मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण टाळण्या इतपत त्यांनी मजल मारलेली आहे.

Independence Day
Mumbai : भिवंडी सीरिया करण्याचा कट! तपासात धक्कादायक खुलासा

शासनाने हर घर तिरंगा अभियानांतर्गत तीन दिवस तिरंगा ध्वज फडकविण्याचे आदेश दिलेले आहेत.शिवाय शासकीय कार्यालयांना अनिवार्यपणे ध्वजारोहण करण्याचे आदेश आहेत.परंतु माहूर तहसील कार्यालयात व ऐतिहासिक रामगड किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात आलेला नाही,

ही बाब अतिशय गंभीर असून माहूरचे वादग्रस्त तहसीलदार राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक,शेतकरी यांना अपमान जनक वागणूक देतच होते.परंतु,आज त्यांच्याकडून मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण टाळल्याने शासनाचे आदेश धुडकावून शासनाचा व राष्ट्रीय ध्वजाचा सुद्धा अपमान करण्यात आला आहे.

वसंत केशव कपाटे, माजी सभापती तथा ज्येष्ठ पत्रकार,माहूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.