Nanded News : एका वेचणीतच ‘उन्हाळा’

कपाशी पिकावर प्रादुर्भाव : वातावरण बदलाचा फटका
nanded
nandedsakal
Updated on

किनवट : अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कापसावर संकट आले आहे. कापसावर झालेल्या विविध रोग व पावसामुळे फुल, पातीवर परिणाम झाला. त्यामुळे एका वेच्यातच कापसाचा ‘उन्हाळा’ होत आहे. शेतकरी गेल्या काही वर्षापासून अनेक संकटांचा सामना करीत आहेत. या संकटांतून अन्नदाता स्वतःला सावरत आहेत.

nanded
Nanded News : महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप;नागरिकांची कामे खोळंबणार!

यंदा अतिवृष्टी, संततधार पाऊस, पूर, अवकाळीचा पाऊस आदी संकटांना तोंड दिले. पावसामुळे आलेला मररोग, गोगलगाईचे आक्रमण, कीड अशा संकटांचाही मुकाबला केला. पीक काढणीवर असताना परतीच्या पावसाने परत एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावला. त्यानंतरही प्रयत्न करून शेतकऱ्यांनी आपले पीक वाचविले. मात्र, अवकाळी पावसाने असलेल्या पिकांवर पाणी फेरले. कापूस चांगला होतो. त्यामुळे सोयाबीनमध्ये झालेले नुकसान कापसातून काही प्रमाणात दूर होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा प्रादुर्भाव कापसावर झाल्याने चांगल्यास्थितीतील कापूस काळवंडला. हा प्रादुर्भाव एका ठरावीक क्षेत्रात नसून, सर्वदूर दिसून येत आहे. त्यामुळे कापसाची पाने गळून पडत आहेत. विशेष म्हणजे पानगळनंतर नवीन फुल, पाती येण्याची शक्यता फार कमी असल्याचे मत कृषी विभागाचे आहे. या प्रादुभावामुळे शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत. कापसाचे भाव वाढत नसताना आता एका वेच्यातच कापूस गेल्यास या हंगामातील सर्वांत मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. हंगाम संपतानाही संकटांची मालिका सुरूच आहे. शेवटच्या टप्प्यात कापसावर झालेला प्रादुर्भाव शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

nanded
Nanded News : धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट नको

उत्पादनात मोठी घट

अनेक संकटामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला होता. त्यात कापसावर झालेल्या परिणामाची आणखी भर पडली आहे. अवकाळी पावसाने कापसाचे नुकसान झाले. कापसाची पत घसरल्याने दरातही घसरण झाली आहे. एकीकडे उत्पादन घडले असून, आता दर घसरल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. अजूनही पीकविमा व नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे नवीन हंगामात शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()