नागरी कृती समितीचा कोरोना जनजागृतीसाठी पुढाकार...

नांदेड - नागरी कृती समितीचा कोरोना जनजागृतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
नांदेड - नागरी कृती समितीचा कोरोना जनजागृतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
Updated on

नांदेड - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अजूनही सुरुच आहे. काही नागरिक अजूनही प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता नागरी कृती समितीने पुढाकार घेतला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन नागरी कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य स्पीकरद्वारे जनजागृती करत आहेत. 
 
नागरी कृती समितीच्या कोरोना जनजागृती अभियानास जनतेकडूनही प्रतीसाद मिळत आहे. मागील आठवड्यापासून हे जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. नांदेडमध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त मुख्याध्यापक टी. एम. पाटील व नागरी कृती समितीचे संयोजक प्रा. डाॅ. लक्ष्मण शिंदे यांच्यासह सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. 

बाजार, चौकात संवादातून जनजागृती
श्री. पाटील आणि डॉ. शिंदे हे दोघेजण दररोज सकाळी गर्दी होत असलेल्या ठिकाणी जसे भाजीपाला व फळ मार्केट तसेच चौकाचौकामध्ये जाऊन प्रत्यक्ष लोकांना स्पीकरद्वारे समजून सांगत संवाद करीत आहेत. मागील काही दिवसांपासून विशेषतः लॉकडाउन संपल्यानंतर लोकांच्या मनातील कोरोना विषयी जी भीती होती ती कमी झाल्यामुळे व प्रशासनाने नरमाईचे धोरण अवलंबिलेले पाहून लोकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करणे सुरु केले आहे. नागरिक घराबाहेर बिनधास्तपणे बाहेर पडत आहेत. स्वतःची सुरक्षा न पाहता हे शहरात मुक्त वावर करीत आहेत. हे पाहून नागरी कृती समितीने  विनंतीवजा सूचना केली आहे. 

मेगाफोनद्वारे (स्पीकर) आवाहन 
सुरक्षित अंतर ठेवा, मास्कचा वापर करा, स्वतः ची काळजी घ्या, कुटूंबाची काळजी घ्यावी म्हणजे देशाची काळजी घेतली, असे समजावे. आपण सुरक्षित तर देश सुरक्षित, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, गर्दी करू नये, आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे. सँनीटायझरचा वापर करा, हात वारंवार धुणे, रस्त्यावर थुंकू नका, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा या व इतर सूचना मेगाफोनच्याद्वारे लोकांपर्यंत पोहचून जनजागृती करण्यात येत आहे. 

अनेकांनी घेतला पुढाकार
जनजागृती अभियान पाहून राज पार्क सोसायटीचे पदाधिकारी विजय गाभणे, श्री. लष्करे व श्री. बंडावार यांनी राजपार्क, वेदांतनगर येथे अभियान राबविले. तसेच चळवळीत काम करणाऱ्या महेश शुक्ल यांनी मगनपुरा येथे तर प्रदीप नागापूरकर यांनी विनायकनगर भागात ॲड. रविंद्र रगटे यांनी विवेकनगर येथे तर गंगाधर गायकवाड यांनी बंजरग कॉलनी येथे त्यांच्या भागातील नागरीकांना समजून सांगण्यासाठी बोलावून घेतले होते. 

जनजागृती आवश्‍यक - डॉ. काब्दे
कोरोनापासून वाचण्यासाठी अजूनही औषध आले नाही त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. जनजागृतीमुळे जनतेकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया चांगल्या व बोलक्या आहेत. लोकांना वारंवार सांगितले तर कुठे तरी लक्षात राहते आणि तेच काम नागरी कृती समिती करीत आहे. या पुढेही अभियान सुरू राहणार असून जनतेला आवाहन करण्यात येणार आहे. 
- डॉ. व्यंकटेश काब्दे, माजी खासदार.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.