Success Story : मोलमजुरी करून चार मुलींना ‘कामयाब’ बनविणारी आई

आदिवासी पट्ट्यातील वच्छला मेश्राम ठरल्या आधुनिक सावित्री!
inspiring story of tribal women vaschala bhaurao meshram journey to make her child life better
inspiring story of tribal women vaschala bhaurao meshram journey to make her child life better Sakal
Updated on

माहूर : आदिवासी बहुल दुर्गम सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावरील माहूर तालुक्यातील वडसा या छोट्याशा गावातील आदिवासी समाजातील भूमिहीन श्रीमती वच्छला भावराव मेश्राम या मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या चार मुलींना सिद्ध करून आधुनिक सावित्री बनून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

ध्येय गाठण्याची जिद्द आणि चिकाटी आपल्यात असेल तर असाध्य आणि अवघड गोष्ट सुद्धा सहज साध्य करता येते. अशात अनेकजण चुकीचा सल्ला देऊन आपल्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असतात.

पण, आपण सावध राहून निश्चयाने आपला मार्ग चालत राहिलो तर नक्कीच यशस्वी होतो, अनेकांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असते, हे मान्य आहे. परंतु अशा खडतर प्रवासातूनच मार्ग कसा काढावा लागतो याचे बाळकडू आई वच्छलाने वडिलांचे छत्र हरविलेल्या नयना,

प्रतिभा, अंजली व भावनाला पाजल्याने संधीचे सोने करून या चारही मुली आज आपल्या पायावर उभ्या आहेत. मोठी मुलगी नयना महसूल विभागात नोकरीला आहे, तर दुसरी मुलगी प्रतिभा बँकेत नोकरीला आहे.

तिसरी मुलगी अंजली चौथीमध्ये स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षा पात्र करून नवोदय विद्यालयात १२ वी पर्यंत शिक्षण घेतले, दरम्यान वैद्यकीय शिक्षणासाठी पात्रता परीक्षेत तिने यश मिळविले. एमबीबीएससाठी नांदेड येथील शासकीय महाविद्यालयात तीने प्रवेश घेतला आहे.

चौथी मुलगी भावना हिने सुद्धा बारावीत घवघवीत यश संपादन केले असून उत्तराखंडमध्ये नीटची तयारी करत आहे. श्रीमती वच्छला भावराव मेश्राम यांच्या चारही मुलींचे निर्भेळ यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

वच्‍छलाबाई मेश्राम यांचे पती भावराव यांचे २००८ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्या खचल्या नाही, तर मोलमजुरी करून मुलींना शिक्षण दिले. सध्या वच्छलाबाई मेश्राम या गावातच आशा वर्कर आहेत.

आई व चार बहिणी असं आमचं छोटसं कुटुंब, मी दुसरीमध्ये असताना वडिलांचा मृत्यू झाला, माझ्या आईने त्यांची कमतरता भासू न देता अहोरात्र मेहनत करून मला शिकवले. माझ्या आईच्या कष्टामुळे मी अभ्यास करायचे शिकले. त्यामुळे मी इयत्ता ४ थी मध्ये स्कॉलरशिप परिक्षा उत्तीर्ण केली व पुढे नवोदय परिक्षा उत्तीर्ण झाले. त्या संधीचे सोने करून मी नीट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर एमबीबीएसला मला प्रवेश मिळाला.

— डॉ. अंजली मेश्राम, वडसा, माहूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()