इसापूर धरणाचा पाणीसाठा 75 टक्क्याच्या पुढे पैनगंगा नदीला पूर- सावधानतेचा ईशारा

file photo
file photo
Updated on

नांदेड :- पुसद तालुक्यातील पैनगंगा नदीवरील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर) धरण 73 टक्के भरले असून या धरणातून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला असल्याने धरणाच्या पाणी पातळीत अतिशय वेगाने वाढत होत आहे. सध्या धरणात अंदाजे 753 घनमी / सेकंद इतका येवा येत आहे. अशाच प्रमाणात येवा धरणात येत राहिल्यास येत्या 4 ते 5 दिवसात धरण शंभर टक्के भरेल. इसापूर धरणातील पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीपात्रात सोडल्यामुळे पेनगंगा नदीला पूर येऊ शकतो हे लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिला आहे.

संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पेनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांना आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत संबंधित तहसिलदार, पोलीस विभाग यांना सुचना देण्यात आली आहे, अशी माहिती उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे 

आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी ऑनलाईन भरती मेळाव्याचे आयोजन

नांदेड :- नांदेड जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी विविध क्षेत्रामध्ये जसे औद्योगिक, महामंडळ, पॅरामेडीकल सेक्टरमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यासाठी गुरुवार 20 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन भरती मेळाव्याचे आयोजन सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत करण्यात आला आहे.

मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने 20 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन जॉब फेअर (भरती मेळावा) आयोजित करण्यात आला आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी Link for Google form https:/docs.google.com/forms/d/e/1FalpQLSegmDAM6YXO5ou1f_cRFIL4gyDBWM9Yj2pHQYWpz89tj5b6zQ/viewform?usp=sf_Link

Video Conference Link https://global.gotomeeting.com/join/779416021  या लिंकवर 20 ऑगस्ट रोजी गुगल  फॉर्म (google form) मध्ये नोंदणी करुन व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे भरती मेळावा ऑनलाईन जॉब फेअरसाठी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.

Access Code- 779-416-021 या लिंकवर उपस्थित  रहावे, असे आवाहन नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. बी. कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.