Nanded News : गुळाच्या चहाची ‘तल्लफ’ वाढली! किनवटमध्ये ठिकठिकाणी वाढली स्टॉल्सची संख्या

सर्वत्र वेगवेगळ्या चहाचा ट्रेंड सुरू आहे. बाजारात नवनवीन चहा येत असल्याने अनेकांना चहाने भुरळ घातली आहे.
jaggery tea craze in nanded business entrepreneurship market tea stall youth
jaggery tea craze in nanded business entrepreneurship market tea stall youthSakal
Updated on

किनवट : सर्वत्र वेगवेगळ्या चहाचा ट्रेंड सुरू आहे. बाजारात नवनवीन चहा येत असल्याने अनेकांना चहाने भुरळ घातली आहे. काही तरुणांनी तर ठरवून चहाचे स्टॉल्स लावले आहेत. यात उच्चशिक्षित तरुणांचाही समावेश आहे. दरम्यान, या दोन वर्षांत गुळाच्या चहाचा ट्रेंड आहे. दहा रुपयांना ‘एक कट’ चहा मिळत असून या चहाची अनेकांना गोडी लागली आहे.

जुनं ते सोनं अशी म्हण आहे. या म्हणीची प्रचिती गुळाच्या चहामुळे येत आहे. कामाच्या ताण, प्रवास यात हा चहा एनर्जी देत आहे. एकूणच काय तर गुळाच्या चहाचा शहरात व गोकुंदा परिसरात ट्रेंड सुरू झाला आहे.

अनेक ठिकाणी गुळाच्या चहाची दुकाने दिसत आहेत. साखरेच्या चहापेक्षा गुळाच्या चहाची चव वेगळी आहे. साखरेपेक्षा गुळाचा गोडवा अधिक टिकतो. त्यामुळे त्याला पसंती दिली जात आहे. अनेक व्यावसायिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुळाच्या चहाचे फायदे सांगत आहे. अनेक गुळाचे फायदे सांगणारे फलक लावले आहेत.

jaggery tea craze in nanded business entrepreneurship market tea stall youth
Nanded Tourism News : पुरातत्त्व विभागाचे धोरण पर्यटकांच्या मुळावर!

गुळाचे फायदे आणि तोटे

  • साखरेच्या तुलनेत गुळामध्ये भरपूर जीवनसत्त्वे.

  • गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते.

  • गुळाच्या अती सेवनानं स्क्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं.

  • १० ग्रॅम गुळामध्ये जवळपास ९.७ ग्रॅम इतकी साखर असते.

  • मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाची चहा टाळावी.

  • योग्य पद्धतीने तयार न केला गेलेला गूळ खाणे धोक्याचे

  • गूळ मुळातच उष्ण पदार्थ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.