नांदेड : पावसाळा चालू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते. आणि यातूनच सापांना मारण्याच्या घटना व सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जुन- ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणुन या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता या आपातकालीन परिस्थीची शास्त्रीय माहिती घ्यायला हवी.
भारतात आढळणाऱ्या 52 विषारी सापांच्या जातीपैकी नांदेड व परिसरात मानवी वस्तीजवळ केवळ चारच जाती या विषारी आहेत. त्या म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे या आहेत.
घराच्या आसपास साप येऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी -
1) घराच्या भिंती व कुम्पनाच्या भिंती यांना पडलेली भोक बुजवावेत. यांमध्ये उंदरासारखे प्राणी बसतात व त्यांची शिकार करण्यासाठी साप येण्याची शक्यता असते.
2) घराजवळ पाला- पाचोळा, कचऱ्याचे ढिग, दगड- विटाचे ढिग, लाकडांचा साठा करुन ठेऊ नये.
3) घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.
4) खिडक्या- दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
5) सरपण, गोवऱ्या घरालगत न ठेवता, काही अंतरावर पण जमिनीपासून थोड्या उंचीवर ठेवाव्यात.
6) गवतातुन चालताना पायात बूट असावेत.
7) अंधारातुन जाताना नेहमी बैटरी सोबत बाळगावी.
8) रात्री शक्यतोवर जमिनीवर झोपु नये कारण साप हा निषचर असतात आणि त्यांचा वावर रात्रीला असतो.
9) जमीनीवर झोपायाचे असल्यास अंथरुण भिंती लगत न करता मध्यभागी करावे. सापाना कोपऱ्यातून व अंधरातुन जाने पसंत आहे.
10) जर आपण आणि साप समोरासमोर आलो तर घबरुन न जाता स्तब्ध उभे राहावे, शक्य असल्यास जवळ असलेली वस्तू सापच्या बाजूने फेकावी साप त्या वस्तु कडे आकर्षीत होतो आणि तेवढ्याच वेळात आपण जाऊ शकतो.
येथे क्लिक करा - काही दिवसांपासून तो भारतात परतणार का याविषयी चर्चा सुरु आहे.
$ साप घरात आल्यास काय कराल $
1) साप घरात आल्यास घाबरु नका, शांत राहा, त्याला न मारता आपल्या जवळील जानकार सर्पमित्राला बोलवा.
2) सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षीत अंतरावरुण सापावर व्यवस्थित लक्ष ठेवा, लहान मुले, पाळीव प्राणी यांना सापापासून दूर ठेवा. जेणे करुन त्यांना अपाय होणार नाही.
3) सापाच्या जवळ जाण्याचा, फोटो काढण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करु नका. अश्यावेळेस साप चिडून तुमच्यावर हल्ला करु शकतो.
4) नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो अश्या सापापासून सावध राहावे.
विषारी साप कसे ओळखणार?
१) नाग ( नागराज ) जो फना काढून उभा रहातो तो नाग, टायरच्या ट्यूबमधून पंक्चर झाल्यासारखा आवाज आल्यास जवळ नाग आहे असे समजावे.
२) मण्यार- काळपट निलसर रंग, अंगावर पांढरे पट्टे शेपटीकडे अधिक डोक्याकडे कमी होत जातात हे साफ इतर सापाना खातात.
३) फुरसे- फूट पट्टी एवढी लांबी, शरीरावर वेलबट्टी सारखी नक्षीकाम, डोक्यावर बाणासारखी खूण, दंश करताना जिलेबीसारखा आकार करुन शरीर एक मेकावर घासतो आणि करवतीसारखा करकर आवाज करतो.
४) घोणस- हा साप कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे टिपके असणाऱ्या रेषा असतात, डोक्यावर इंग्रजी V अक्षर असते.
हे उघडून तर पहा - नर्सी नामदेव येथील मंजूर दोन कोटींच्या कामाची प्रशासकीय मान्यता रद्द
पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या गरीब शेतकरी कष्टकरी लोकांना जास्त प्रमाणात साप चावतात त्यामुळे सापाविषयी आणि त्यावर उपचाराची माहिती त्यांच्यापर्यन्त पोहचणे फार गरजेचे आहे. आपल्या परिसरात साप आढल्यास त्याला न मारता वरील खबरदारी घ्यावी व तात्काळ आपल्या जवळच्या सर्पमित्राला संपर्क करावा असे आवाहन हेल्पिंग हैंड्स वाईल्डलाईफ वेल्फेयर सोसायटीचे प्रसाद शिंदे यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.