तीस वर्षांपासून हातावरील शेवया करणाऱ्या कमलबाई; स्वतःच्या घराचेही स्वप्न पूर्ण

कमलबाई राधाकृष्ण जोशी या हडको येथे राहतात. गेल्या ३० वर्षांपासून रवा, गव्हाच्या सोजी पासून हातावरच्या शेवया बनवण्याचे काम त्या करतात.
कमलबाई
कमलबाई
Updated on

नांदेड ः परिस्थितीवर ओरडत बसून चालत नाही. त्यासाठी कष्ट, जिद्द आणि ध्येय या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. अनेकांना हा तीन गोष्टी जमत नसल्याने ते खचून जातात. परंतु, हडकोतील कमलबाई ( Kamalbai hudco) यांनी गत ३० वर्षांपासून हातावरील शेवय्या करुन, पाच घरी स्वयंपाकाची कामे करून स्वतःच्या घराचे स्वप्न (house self) पूर्ण करून दाखविले आहे. (Kamalbai, who has been doing shevaya on her hands for thirty years; Fulfill the dream of owning a home)

कमलबाई राधाकृष्ण जोशी या हडको येथे राहतात. गेल्या ३० वर्षांपासून रवा, गव्हाच्या सोजी पासून हातावरच्या शेवया बनवण्याचे काम त्या करतात. यासाठी शुद्ध तूप दूध, आदी सामग्री वापरुन शेवया तयार करतात. यांत्रिकी युगामध्ये हातावर बनवलेल्या शेवया बाजारात क्वचितच पहावयास मिळतात. आजच्या काळात मशीनपासून तयार केलेल्या शेवया बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, अतिशय किचकट आणि प्रचंड मेहनत करुन हातावरच्या शेवया कमलबाई जोशी बनवतात. हातावर बनविलेल्या शेवयांची खीर चविष्ट लागते. यामुळे त्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे कमलबाई सांगतात.

हेही वाचा - कोरोनाच्या महामारीतसुध्दा पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार श्री केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात आले. यानंतर श्री केदारनाथांचे दिव्य दर्शन संपूर्ण जगाला झाले आहे.

मुंबईपर्यंत पोहचल्या शेवय्या

त्यांच्या शेवया आतापर्यंत औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे, जालना, परभणी, अलिबाग, उस्मानाबाद, लातूरसह अनेक जिल्ह्यामध्ये पोहचल्या आहेत. विशेष म्हणजे सहा घरच्या स्वयंपाकाचे काम करुन तसेच घरची सर्व कामे आटोपून त्या हा व्यवसाय करत आहेत. दिवसाकाठी सहा ते सात तास या कामासाठी घालविल्यानंतर जवळपास अर्धा किलो शेवया तयार होतात. वर्षातील १२ महिन्यांपैकी आठ महिने त्या हे काम करीत असतात. दरवर्षी जवळपास तीस ते चाळीस किलो शेवयांची त्यांना मागणी असते.

स्वतःच्या घराचेही स्वप्न केले पूर्ण

कमलबाई यांचे पती ३० वर्षांपासून गाडीपुरा येथील रेणुका माता मंदिरासमोरील एका भांड्याच्या दुकानात काम करत होते. परंतु, आजारपणामुळे आता त्यांना हे काम करणे शक्य नाही. त्यामुळे ते घरीच आहेत. कमलबाई यांना दुर्गादास, पुरुषोत्तम आणि महेश असे तीन मुले आहेत. त्यापैकी दुर्गादास हा पुणे येथे टॅक्सी चालवतो. तर पुरुषोत्तम हा नांदेडमध्येच फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. पण, कोरोनामुळे गत एक वर्षापासून हा व्यवसाय बसला आहे. तर महेश हा एका बुक स्टॉलवर काम करतो. हात उसने पैसे घेवून कमलाबाई यांनी तीन वर्षांपूर्वी हडकोमध्ये स्वतःचे घर घेतले आहे. हंगामात दहा ते बारा हजार रुपये यातून मिळकत होत असल्याचे कमलबाई यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

परिस्थितीवर रडत बसल्यापेक्षा किंवा कोणाची मदतीची अपेक्षा केल्यापेक्षा स्वतःच्या जिद्दीवर खूपकाही करता येते. कुटुंब चालविण्यासाठी तसेच घरची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी मी दिवसभर कष्ट करते.

- कमलबाई राधाकृष्ण जोशी, नांदेड

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.