कंधार : दऱ्याखोऱ्यात वसलेल्या तालुक्यातून एखादी नदी वाहने म्हणजे पर्वणीच असते. पण ही नदी जेव्हा उग्ररुपधारण करते तेव्हा किती भयानक स्थिती निर्माण होते हे अतिवृष्टीमध्ये पहावयास मिळाले.
डोंगरकपरित वसलेल्या कंधार तालुक्याची कामधेनू असलेली मन्याडनदी पुराच्या पाण्यामुळे वैरी बनली आणि, नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतीमध्ये पाणी शिरले. यामुळे शेतकरी पुरता नागवला गेला. हातातोंडाला आलेले पीक वाहून गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. चार दिवसात होत्याचे नव्हते झाले. सर्वकाही गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
शेतकरी भविष्याची स्वप्न रंगत तो संसाराचा गाडा हाकत असतानाच अतिवृष्टी झाली, नव्हे अतिवृष्ट्या झाल्या. त्याही शंभर मिलिमीटरच्यावर. संततधार पावसामुळे सखोल भागातील पिके पाण्याखाली गेल्या. मन्याड नदीला पूर येऊन काठच्या शेत जमिनी खरडून गेल्या. पिके पुराच्या पाण्यात पूर्णतः वाहून गेले. काठच्या शेतीत गुडघाभर, कमरेपर्यंत पाणी साचले.
कंधारसह घोडज, शेकापूर, संगमवाडी, बिजेवाडी, बहाद्दरपुरा, जंगमवाडी, मानसपुरी, फुलवळ, गोणार, जाकापूर, कौठा, नारनाळी, शिरसी खुर्द, शरसी बुद्रुक, शिरूर, तेलूर, वरवंट, बाचोटी, गोगदरी, वळसंगवाडी, चौकी धर्मापुरी, चिंचोली, कळका, मंगनाळी, कागणेवाडी, टोकवाडी, पिंपळ्याचीवाडी, वाखरड, वाखरडवाडी, बाळांतवाडी, ब्रम्हवाडी, मुंडेवाडी आदी ठिकाणच्या शेकडो हेक्टर शेतीमध्ये नदीच्या पुराचे पाणी घुसून जमिनी रखडल्या.
कंधार तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे जीवनमान खरीप हंगामावरच अवलंबून असल्याने मोठ्या कष्ठाने ते खरिपाची तयारी करतात. परांतु प्रत्येक वेळी त्यांना नापिकीला सामोरे जावे लागते. पावसाचा लहरीपणा त्यांच्या मुळावर येतो. यंदाही त्यांच्यावर अतिवृष्टीच्यारुपाणे मोठे संकट कोसळले. पुढे कसे होईल अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
- हौसाजी वाघमारे, चौकी धर्मापुरी, कंधार.
भरपूर उत्पादनाची आशा बाळगून विविध कामाच्या नियोजनात बळीराजा व्यग्र असतानाच पावसाने झोडपले. संततधार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटले. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे स्वप्न अक्षरशः धुळीस मिळाले. त्यांना कशाचाही आधार राहिला नाही. सरकारच्या मदतीवरच सर्वकाही अवलंबून आहे.
- सुधाकर कौसल्ये, चिंचोली, कंधार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.