खरिपाच्या पेरणीला सुरवात; सोयाबीनची पेरणी ‘बीबीएफ’वर, हळद, कपाशी लागवडही

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात १६६. ४० मिलीमीटरनुसार २०. ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात खरिपाची पेरणी सुरु
नांदेड जिल्ह्यात खरिपाची पेरणी सुरु
Updated on

नांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसापासून सोयाबीनसह कपाशी, हळद, तुर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ९१५ हेक्टरनुसार २०.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली. सोयाबीनची पेरणी यंदा यांत्रीकरणाच्या माध्यमातून रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने होत आहे.

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात १६६. ४० मिलीमीटरनुसार २०. ४० टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकरी पेरणींच्या कामांना लागले आहेत. यंदा पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून होता. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून कपाशी लागवडीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. यासोबतच जिरायती भागात सोयाबीन, कापूस, ज्वारी यासह आंतरपिके म्हणून तूर, मूग, उडीद, तीळ, कारळ या पिकांचीही लागवड केली जात आहे.

हेही वाचा - महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की; वाईबाजार उपकेंद्रातील घटना

यंदा शेतकरी पारंपरिक बैलजोडीच्या सहायाने तिफणीच्या माध्यमातून पेरणी करण्यापेक्षा यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अनेकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ) पेरणी करण्यावर अधिकचा भर दिला आहे. तर हळद लागवडीसाठी शेतकरी सरसावले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ९१५ हेक्टरनुसार २०.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदा साडेआठ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होइल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. यात सोयाबीन चार लाख हेक्टर तर सव्वादोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होइल असे सांगण्यात आले होते. परंतु यंदा कपाशीच्या लागवडीत घट होवून सोयाबीनचा पेरा वाढेल अशी शक्यता कृषी निविष्ठा विक्रेते व्यक्त करीत आहेत.

येथे क्लिक करा - अहो, लसीकरणासाठी मी कांजीवरमची साडी घेतलीय ना, त्याचा मॅचिंग ब्लाऊज टेलर दहा दिवसांनी देणार आहे. तो मिळाल्यानंतरच मी लस घेणार आहे.’

पेरणीयोग्य पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरवात केली आहे. पिकांची उगवणही चांगली होत असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीतून दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी शंभर मिलीमीटर पावसानंतरच करावी.

- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()