धक्कादायक : धुऱ्याचा वाद बेतला जिवावर; शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने केले वार

download (2).jpg
download (2).jpg
Updated on

सगरोळी, (ता.बिलोली, जि. नांदेड) ः सगरोळी (ता. बिलोली) येथे शेतधुऱ्याच्या वादातून शंकर हणमंता महाजन (वय ६०) या शेतकऱ्यावर धारदार कुऱ्हाडीने डोक्यावर व शरीरावर प्राणघातक वार केल्याने शंकर हाणमंता महाजन या वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. एक) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली असून आरोपी परशुराम इलतेपोड, त्याचा मुलगा श्रीकांत इलतेपोड व महेंद्र इलतेपोड, लक्ष्मण अंबे या पाच व्यक्तींवर ३०२ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी परशुराम इलतेपोड व महेंद्र इलतेपोड हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत. तर आरोपी श्रीकांत इलतेपोड व लक्ष्मण अंबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शंकर महाजन या शेतकऱ्याच्या जमिनीला लागूनच परशुराम इलतेपोड यांचे शेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये धुऱ्यावरून वाद चालू होता. दोघेही दररोजप्रमाणे शेतात काम करीत होते. पुन्हा याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले व परशुराम इलतेपोड व इतरांनी रागाच्या भरात शंकर महाजन या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर व शरीरावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शंकर महाजन या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.


हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल 
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्यासह बिट जमादार जनार्धन बोधने, सोनकांबळे, चंद्रमुणी सोनकांबळे, कोत्तापल्ले, निमलवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून मयताचा मुलगा महादू महाजन यांच्या तक्रारीवरून परशुराम ईलतेपोड यांच्यासह इतर हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे बिलोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी सांगितले. घटनास्थळावरून आरोपी परशुराम इलतेपोड व महेंद्र इलतेपोड फरार झाले आहेत. तर आरोपी श्रीकांत इलतेपोड व लक्ष्मण अंबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नातेवाइकांनी मृतदेह घटनास्थळावरून हालवण्यास विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिक भयभीत झाले आहेत.


मयत शेतकऱ्याच्या नावाच्या अनेक व्यक्ती असल्याने गोंधळ
शंकर महाजन या शेतकऱ्याचा खून झाल्याची बातमी काही वेळातच परिसरात पसरली. या नावाच्या अनेक व्यक्ती सगरोळीत वास्तव्यास आहेत. अनेकांना ही घटना समजताच गावातील व बाहेरगावांहून नागरिकांनी भ्रमणध्वनीवरून विचारपूस करण्यास सुरवात केली. या वेळी अनेकांनी वेगवेगळे तर्क लावल्याने मोठा गोंधळ उडाला व अनेकजण संभ्रमात पडले होते. काही काळ पत्रकारामध्येही संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, काही वेळातच मयत व्यक्तीची संपूर्ण माहिती समजताच हा संभ्रम दूर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.