कोटीतीर्थ पुलाचे काम मार्गी लावणार- आमदार कल्याणकर
नांदेड : नांदेड तालुक्यातील अनेक वर्षांपासून कोटीतीर्थ व हस्सापूर रस्त्यावरील पुलाची मागणी नागरिकांनी केली आहे. याकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी लक्ष दिले नाही. मात्र आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुलाच्या जागेची पाहणी केली असून लवकरात लवकर पुलाचा प्रश्न सोडविणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे.
नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर हे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून जात असतात. त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कोटीतीर्थ येथे जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक वर्षापासून कोटीतीर्थ व हसापुर गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरच सुगावकडून येणाऱ्या मोठ्या नाल्यावर पूल नसल्याकारणाने शेतकऱ्यांना नेहमीच अडचणी येत आहेत. ही बाब शेतकऱ्यांनी आ. कल्याणकर यांच्यासमोर मांडताच त्यांनी तात्काळ पुलाच्या ठिकाणची पाहणी केली. याबाबत शासन दरबारी निधीची मागणी करणार असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
हेही वाचा - रुग्ण वाढल्याने महापालिका झाली खडबडून जागी...
बि- बियाणे खरेदी बाबत सतर्कता पाळा
या पुलाचे काम मंजूर करून ते लवकर नागरिकांच्या सेवेत सुरू करणार असे सांगितले. पुलाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबीत होता. त्याबरोबरच बी- बियाणे खरेदीबाबत देखील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्याही लवकरात लवकर सोडवु असे आश्वासन दिले. येथील पिण्याच्या पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणात क्षार असल्याकारणाने काहीजणांना शारिरिक विकार देखील झाले आहेत. आ. कल्याणकर यांनी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करू असे आश्वासन दिले. यासोबतच थुगाव येथे देखील धोबीघाट व स्मशानभूमीची मुख्य समस्या आहे. या समस्येचाही विचार करून ती मार्गी लावू.
कोटीतीर्थ व थुगांव परिसरातील नागरिकांची होती उपस्थिती
यावेळी कोटीतीर्थ व थुगांव परिसरात पाहणी करतांना त्यांच्यासमवेत पंचायत समिती सभापती प्रतिनिधी बबन वाघमारे, माजी सरपंच बालाजी वाघमारे, नेताजी भोसले, रामराव भोसले, विश्वनाथ भोसले, भगत भोसले, भीमराव भोसले, ज्ञानदेव भोसले, रंगनाथ भोसले, देवानंद भोसले, धनंजय पावडे, संतोष भारसावडे, नवनाथ काकडे, माधव हिंगमिरे, राजू वाघमारे, गणपत वाघमारे, वामन वाघमारे, माधव वाघमारे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.