बाबो...प्रयोगशाळेतील साहित्यच केले गुल?

nnd09sgp07.jpg
nnd09sgp07.jpg
Updated on

भोकर, (जि. नांदेड) : सध्या देशात कोरोनाच्या विषाणूंमुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे; पण भोकर तालुक्यातील सतरा आरोग्य उपकेंद्रांना देण्यात आलेल्या प्रयोगशाळा तपासणी सेवा आणि बळकटीसाठी आवश्यक साधनसामग्रीकरिता तीन महिन्यांपूर्वी सुमारे साडेअकरा लाखांचा निधी खर्च करण्यात आला. तरी अद्याप साहित्यच मिळाले नाही. गुल झालेल्या साहित्यांचा त्वरित शोध लावून उच्चस्तरीय चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांनी केली आहे.


उपकेंद्राला पुरवठा करावा असे आदेश
जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की देशात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संबंधित आरोग्य विभाग जिवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहे. अशा परिस्थितीत भोकर तालुक्यातील आरोग्य अधिकारी झटून कामाला लागले आहेत. वेळप्रसंगी संकटाशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत. ही जमेची बाजू असताना मात्र केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे तालुक्यातील भोसी, मोघाळी आणि किनी आरोग्यवर्धिनी केंद्रात असलेल्या एकूण १७ आरोग्य उपकेंद्रांत देण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा तपासणी सेवा आणि बळकटीसाठी आवश्यक साधनसामग्री जिल्हास्तरावर खरेदी करून उपकेंद्राला पुरवठा करावा असे आदेश दिले आहेत.


तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
यासाठी सुमारे साडेअकरा लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. येथील अधिकाऱ्यांनी मात्र याकडे काणाडोळा केल्याने संबंधित उपकेंद्रातील साधनसामग्री गुल झाल्याचे पाहणीत आढळून आले आहे. या प्रकरणी वरिष्ठांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा सदस्य सुरेश बिल्लेवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

तालुक्यातील उपकेंद्राला आलेले साहित्य हे आम्ही सध्या वाटप सुरू केले आहे. माझ्या कार्यालयात पूर्ण साहित्य आहे. काहींनी घेऊन गेले आहेत. उर्वरित लवकरच देण्यात येईल. ट्रान्स्पोर्ट सेवा आजपर्यंत बंद असल्यामुळे साहित्य येण्यास तीन महिने विलंब झाला आहे. या व्यवहारात कुठलाच गैरव्यवहार झाला नाही.
- राहुल वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी, भोकर.

संपादन - स्वप्निल गायकवाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()