Pandharpur Wari 2024 : ‘वारी हाच श्वास, वारी हाच ध्यास...पांडुरंग’ 30 वर्षांपासून माजी आमदार रोहिदास चव्हाणांची परंपरा

तीस वर्षांपासून पत्नी आशा चव्हाण हिच्यासोबत रंगनाथ महाराज परभणीकर ( दिंडी क्र.४८), तर कधी धोंडू तात्या महाराज यांच्या दिंडीतून आळंदीहून वारीत सहभागी होतो.
Pandharpur Wari 2024
Pandharpur Wari 2024Sakal
Updated on

- बा.पु. गायकर

लोहा : कायिक, वाचिक भावनेने गेली तीस वर्षांपासून भूवैकुंठ पंढरपूरची वारी सातत्याने सुरू आहे. माझे वडील खोबराजी पाटील चव्हाण हे वारकरी संप्रदायातील. आई-वडिलांचे घरातच सात्विक संस्कार मिळाले. त्यामुळे १९८० पासून गावातूनच साधू महाराज कंधारकर यांच्या दिंडीतून पायी वारी सुरू झाली.

तीस वर्षांपासून पत्नी आशा चव्हाण हिच्यासोबत रंगनाथ महाराज परभणीकर ( दिंडी क्र.४८), तर कधी धोंडू तात्या महाराज यांच्या दिंडीतून आळंदीहून वारीत सहभागी होतो..‘वारी हाच श्वास, वारी हाच ध्यास...पांडुरंग, पांडुरंग’...अशी भावना माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

रोहिदास चव्हाण म्हणाले, की माणसाला किंमत नाही, त्याच्या गुणाला किंमत असते हे वारीतून शिकता येते. माणसाचं जगणं हे अल्पायुशी आहे. वारकरी लोकप्रतिनिधी असलो तरी वारीच्या काळात कुठेही रेस्ट हाउस अथवा लॉजवर थांबत नाही.

मिळेल त्या पाण्याने स्नान करतो, वारकऱ्यांसमवेत नाष्टा घेतो. माझी वारी आळंदीपासून-पंढरपूर अशी सुरू असते. परमेश्वरी अंशाच्या अंकित राहिल्यामुळे समाज आणि घर सुसंस्कारीत होण्यास वेळ लागत नाही.

Pandharpur Wari 2024
Nanded Traffic : नांदेड शहरात आज वाहतूक मार्गात बदल; मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी लाखो समाजबांधव येणार

ज्ञानोबा-तुकारामांचा आसमंत दणाणूण सोडणारा निनाद. टाळ- मृदंगाची साद आणि मुखी विठ्ठलनाम. हातात भगवा ध्वज. कपाळी गोपीचंदन, बुक्का आता हातात टाळ वाजवत दिंडी परिसर भक्तिमय करून टाकते. हा अमृतानुभव जीवन धन्य करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.