लॉकडाउन, तरीही बँकेला 6 कोटी 90 लाखाचा निव्वळ नफा

File Photo
File Photo
Updated on

नांदेड : देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने (ता.२२) मार्चच्या मध्यरात्रीपासून देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर राज्य - जिल्हा आणि तालुका पातळीवर देखील सार्वजनिक ठिकाणे गर्दी होणार नाही, याची खबरदारी म्हणून शासकीय व निमशासकीय कार्यालय काही दिवसापूरती बंद केली होती.

लॉकडाउनच्या काळात देखील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना शासकीय अनुदान, पीक विमा, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, ऊस उत्पादक शेतकरी यांना आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांना रक्कम पोहचिती केली. मागील ४० दिवसात १७८ कोटी रुपये वाटप केले. मागील वर्षीपेक्षा यंदा लॉकडाउन असताना देखील बँकेला ढोबळ नफा पावने आकरा कोटी इतका तर सहा कोटी ९० लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याची नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. सुनिल कदम यांनी गुरुवारी (ता.२१) माहिती दिली. 

चार लाख डेबिट कार्डची आॅर्डर

जिल्हा बँकेच्या माध्यमातून आॅनलाईन व्यवहार करण्यावर अधिक भर असणार आहे. त्यामुळे काही दिवसातच साडेचार लाख डेबिट कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. चार लाख डेबिट कार्डसाठी आॅर्डर देण्यात आली. कोरोना नंतरचे जग प्रचंड बदललेले असेल तेव्हा या बदलास सामोरे जाण्यासाठी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत पहिली एटीएम मशिन बसविण्यात येणार असून बँकेचे स्वतंत्र एटीएम मशिन सुरु झाल्यास बाहेरुन आलेल्या ग्राहकांना जास्तवेळ पैशासाठी रांगेत उभे राहण्यापासून दिलासा मिळणार असल्याचे डॉ. कदम म्हणाले. 

खरीप हंगामासाठी १८५ कोटी उद्दिट्ये

कर्जमाफीनंतर ज्या ग्राहकांना बँकेचे कर्ज हवे आहे, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या वेबसाईटवर जाऊन फॉम अपलोड करुन तो आॅनलाईन फॉर्म भरल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेनी १८५ कोटी रुपयाचे कर्ज वाटपाचे उद्दिट्ये ठेवल्याचे ते म्हणाले. 
  
राष्ट्रावादी वेल्फेअर ट्रस्टकडून फेसशिल्डचे वाटप 

बँकेस पावनेसात कोटी रुपयाने नफा झाला असला तरी, ज्या साखर कारखाण्यास बँकेनी कर्ज दिले त्या साखर कारखाण्यांमुळे बँकेस प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. साखर कारखाण्याकडील थकित रक्कम वसूलीसाठी जिल्हा बँकेच्या वतीने सर्व ते प्रयत्न सुरु आहेत. बँकेचा संचित तोटा भरुन निघेपर्यंत केंद्राने बँकेस इतर कुठलेही अतिरिक्त चार्ज लावू नये अशी मागणी जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने कोरोना स्थितीत काम करणारे माध्यमांचे प्रतिनिधी डॉ. सुनिल कदम, बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. अजय कदम यांच्या हस्ते फेश सिल्डचे वाटप करण्यात आले.
      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.