नांदेड : ऑरेंज झोनमधून रेड झोनच्या दिशेने चाललेल्या नांदेड जिल्ह्यात १७ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण दोन-तीन दिवसात सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काही दिवसात परिस्थिती सुधारली तर आढावा घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालावधी तीनहून १७ मेपर्यंत वाढवला असला तरी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्हे व महानगरांत काही प्रमाणात दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. रेड झोनमधील बाधितांचे क्षेत्र नसलेल्या भागात देखील काही प्रमाणात लहान एकल दुकाने सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली. त्याचप्रमाणे सकाळी १० ते सायंकाळी सहा अशी वेळ निर्धारित करून सीलबंद दारू विक्रीची दुकाने देखील सुरू करण्यास हिरवा झेंडा दाखवला. अर्थात शारीरिक सुरक्षित अंतर, सॅनिटायझर व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अटी लादल्या. याशिवाय घराबाहेर पडताना स्वतः च्या खाजगी कारमध्ये दोन किंवा तीन जण आणि दुचाकीवर एकाच जणाला परवानगी देण्यात आली.
हेही वाचाच - भयंकरच : गुरुद्वाराचे ‘ते’ कर्मचारी फरारच, अहवाल मात्र कोरोना पॉझिटिव्ह
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील आठवड्यात केलेल्या वर्गवारीत नांदेड जिल्हा ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये गेला. कोरोनाचा शिरकाव होऊन धोका वाढला तरी नवीन वर्गवारी होईपर्यंत जिल्ह्यातील काही व्यवहार सुरू होतील. लोकांना घराबाहेर पडण्यास थोडी उसंत मिळेल, असे वाटत होते.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रविवारी (ता. तीन मे) रात्री उशीरा जारी केलेल्या आदेशानुसार लॉकडाउनसाठी पूर्वी जारी केलेले आदेश कायम ठेवले आहे. यामुळे भाजीपाला व फळ विक्री सकाळी सात ते ११ आणि दूध, किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते दुपारी एक याच वेळेत सुरक्षित अंतर व अन्य नियमांचे पालन करून सुरू ठेवता येणार आहेत.
हेही वाचलेच पाहिजे - समन्वयाच्या अभावामुळे अडचणीत वाढ...कुठे ते वाचा...
शेतीमाल उद्योग व वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत. नांदेड जिल्हा रेड झोनमध्ये जात असल्याने स्थलांतरित कामगार तसेच वैद्यकीय कारण वगळता इतरांना तूर्तास बाहेर जाता येणार नाही. तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून येण्यावर देखील पुढील काही काळ निर्बंध कायम राहतील. दारूच काय अन्य कोणतीही दुकाने उघडता येणार नाही. तसेच कोणालाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येणार नाही. रस्ते बंद ठेवलेल्या बॅरेकेटिंग पुढील आदेशापर्यंत कायम ठेवल्या जाणार आहेत.
अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती व तसेच वैद्यकीय कारण वगळता अन्य कोणालाही घराबाहेर पडण्यास परवानगी राहणार नाही. ज्या सेवांना वेळ दिला आहे, त्या सेवेतील वेळेशिवाय संबधित व्यक्तींना घराबाहेर पडता येणार नाही. अन्यथा त्यांच्यावर गुन्हे नोंदवून वाहने जप्त करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी नांदेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.