ग्रामीण भागातही लॉकडाउन पाळण्याची गरज

file photo
file photo
Updated on

नांदेड : सध्या देशात लॉकडाउन ता. १७ मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील लॉकडाउनमध्ये वाढ केली आहे. परंतु पुणे, मुंबई किंवा ईतर मोठ्या शहरातून लोकांना गावी जाण्यास सरकार परवानगी देणार आहे. आता गावी शहरातून लोक येणार बर ते आल्यानंतर त्यातील सर्व जण आपापल्या घरी गेल्यावर शांत बसणार नाहीत. ते गावात फिरणार बर कोणी काही बोलाव तर मी का वाईट होऊ म्हणुन सर्व शांत बसणार कदाचित तो कोरोना संक्रमित असु शकत. जे त्याला देखील माहित नसेल कारण कित्येक लोकांमधे कोरोना कोरोना विषाणू आहे परंतु त्यांना काही लक्षणे दिसत नाहीत किंवा कदाचित त्याची रोगप्रतिकारक शक्ति चांगली असेल तर तो त्याच्या शरीरातून निघून जाईल, परंतु तो त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना त्याची लागण देवून जाईल. 

ग्रामीण भागात या कारणामुळे वाढू शकतो कोरोना 
१) ग्रामीण भागामध्ये आजही कमीत कमी पाच माणसांपासून ते ६० ते ७० मानस रोज एकमेकाच्या संपर्कात असतात मग ते एका गावातील असतील किंवा एका कुटुंबातील किंवा एका भावकी मधील किंवा एका वस्तीवरील असतील.
२) रोज काही लोक रोजच्या सारखेच एकमेकाच्या घरी किंवा बाहेर एकत्र विनाकारण टाइमपास म्हणुन गप्पा मारत बसतात. 
३) सर्व गावातील मुल एकत्र क्रिकेट किंवा इतर खेळ खेळतात. 
४) काही महाभाग तर वेळ जात नाही म्हणुन पत्ते खेळत बसतात.
५) शेतातील जेवण पार्ट्या करण्याची जणु शर्यत लागलीये व ते केल्यानंतर लगेच त्याचे फोटो असे सोशल मीडिया वर टाकायचे जणु काही ह्यांनी देशासाठी खूप मोठ काहीतरी केलय.
६) अजूनही ग्रामीण भागामध्ये रोज बसायच्या सार्वजनिक ठिकाण लोक एकत्र येऊन खूप वेळ घालवतात.
७) खूप ठिकाणी लहान मुल दुसर्‍यांच्या घरी तासन तास बसतात किंवा घरातील व्यक्तीच त्यांना बाहेर पाठवतात.
८) रोजच काहीतरी नवीन कारण शोधून जे की टाळायला येण्यासारखे असते काढून बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरायला बाहेर पडतात.
९) एक व्यक्ति दुसर्‍याच्या घरी गेल्यानंतर तो स्वतः काही काळजी घेत नाही व ज्या व्यक्तीच्या तो घरी गेला आहे तेही कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाहीत.

सातारा जिल्ह्यातील वनमाची गाव 
या सर्व गोष्टी करत असताना कोणीही कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. कारण त्यांना या रोगाची विनाशकता माहीत नाही किंवा माहीत असूनही काही लोक दुर्लक्ष करतात. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनमाची या गावांत झाला आहे. तिथे एकदम २५ ते ३० लोक संक्रमित झाले आहेत. अजून किती लोकांना याची लागण झाली असेल देव जाणे कारण हा रोग १४ दिवसांनी आपला खरा रंग दाखवायला सुरवात करतो. या गावामध्ये देखील वरील सर्व कारणांमुळे हा रोग झपाट्याने वाढला आहे.

या गोष्टींचे करा कटाक्षाने पालन 
गावाकडे जर हा आजार बळावला तर तो रोखण्यासाठी पर्याप्त यंत्रणा सज्ज आहे का? किंवा सर्व ग्रामीण भागामध्ये हा आजार शहारासारखा मर्यादित करणे सरकारला तरी शक्य आहे का व विचार करा आणि घरी राहून खालील गोष्टींचे पालन करा. 
१) खूपच गरजेचे असेल तरच घराबाहेर पडणे. 
२) ज्याच्या घरी शहरातून कोणी येणार असल्यास त्यांनी स्वतःहून प्रशासनास तसे अगोदरच कळविले पाहिजे.
३) सार्वजनिक ठिकाणावरून आल्यानंतर योग्य ती काळजी घ्या.
४) काही लोक जर सरकारी कर्मचारी असतील किंवा बँक तसेच ईतर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत असतील तर त्यांनी स्वतःची विशेष काळजी घेतली तर पाहिजेच परंतु गावात इतरांच्या घरात जाण्याचे टाळले पाहिजे.
५) ज्या व्यक्तिंना मधुमेह, हृदयविकार, श्वासनाचे आजार किंवा ईतर गंभीर आजार असल्यास अशा व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नये व अशा व्यक्तींच्या जवळ इतर व्यक्तीने जाणे टाळावे. 
६) घरातील कोणी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्यास त्या व्यक्तींची काळजी एकाच व्यक्तिने घ्यावी व त्यानेही स्वतःला इतरांपासून जाणीवपुर्वक दूर ठेवावे.
७) शक्यतो दुसऱ्याच्या किंवा शेजारच्या घरी काम नसताना जाणे टाळावे.
८) घरातील जेष्ठ नागरिक व ६० ते ७० वयातील लोकानी कोणत्याही परिस्थितीत घरातून बाहेर पडू नये कारण या आजाराचा सर्वात जास्त संसर्ग या लोकांना लगेच होतो.
९) घरातील लहान मुलांना दुसर्‍यांच्या घरी जाऊ देवू नये. 
१०) थोडे दिवस घरातील धार्मिक कार्यक्रम करू नयेत. 

पुढील एक ते दोन महिने महत्वाचे
ग्रामीण भागातील लोकांना विनंती आहे येणारे पुढील एक ते दोन महिने हे खूप महत्वाचे असून तुम्ही तुमचा संयम तुटून देवु नका नाहीतर परत पश्चाताप करायला देखील काही शिल्लक राहणार नाही. तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या पैसे काय आज ना उद्या कमवूच पण स्वतःलाच वाचवू शकला नाही किंवा कुटुंबाला वाचवू शकला नाही तर अशा पैशांचा काय फायदा. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती, घरी रहा सुरक्षित रहा. या आजारातून वाचायचे असेल तर सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.