Lok Sabha Election 2024 : साहेब... आमचं नशिब कधी ऊजळल...? निवडणुकांच्या तोंडावर मतदारांचा सवाल; पुढाऱ्यांचा खुर्चीसाठी खटाटोप

Lok Sabha Election 2024 Latest News : तालुक्यात सध्या लोकसभा निवडणुकीने विविध राजकीय पक्षाचे नेते, पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांना गोंजारत असल्याचे दिसून येत आहे.
Lok Sabha Election 2024 Latest News Bhokar Nanded 
Marathi Political Satire BJP NCP Shivsena Congress News
Lok Sabha Election 2024 Latest News Bhokar Nanded Marathi Political Satire BJP NCP Shivsena Congress News
Updated on

भोकर : इलेक्शन तोंडाशी आले की नेते मंडळीची चुळबुळ सुरु होते..आमुक करू तमूक करु म्हणत कुरवाळतात..ऐरवी कुणीबी पाच वरीस ईचारत नाही..गरीब बिचारा मतदार अठरा विश्व दारीद्रात खितपत पडला आहे.. नेतेमंडळी गोड आश्वासन देऊन पसार होतात..एकदाची खुरची मिळाली की ईसरून जातात..ना शेतीबाडीची पर्वा ना ईकासाचा पत्ता..आमच्या ऊतरंडीत सदा खडखडाटच..आम्ही नेहमीच मतदान देवुन ईमान राखतो पण.. तरी तुम्हाला आमची किव येत नाही..साहेब..आमच नशीब कथी ऊजळल..असा संतप्त सवाल मतदार करून थकला तरी कायबी पदरात पडत नाही. (Lok Sabha Election 2024 Latest News)

पूर्वी खेडोपाडी मान,मर्तबा,ईज्जत,माणूसकीचा ओलावा असायचा.गावातील पारावर बैठक घेऊन मुख्य नायक जो निर्णय देईल त्यावर ग्रामस्थ ठाम असायचे. आता सार रूपच पालटून गेल आहे. दगडाखाली नेते, पुढारी झालेत. कुणी कुणाच ऐकून घेत नाही. गावागावात गटतटाची कीड लागली आहे. लोखाभिमुख विकास होताना दिसत नाही.

निवडणूकीचा हंगाम आला की राजकीय मंडळीची चुळबुळ सुरु होते.एरवी कुणी ईकडे फिरकत नाही. तळागाळातील सर्व सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. प्रामुख्याने शेती, शिक्षण, आरोग्य, पाणी टंचाई अशा अत्यावश्यक सुविधाकडे राजकीय मंडळी लक्ष देत नाहीत. निवडणूक दरम्यान जाहीरनाम्यात नमूद केलेली कामे किती प्रमाणात मार्गी लागली याचा थांगपत्ता लागत नाही.

Lok Sabha Election 2024 Latest News Bhokar Nanded 
Marathi Political Satire BJP NCP Shivsena Congress News
Ramdev Baba: कोविड उपचारावर खोट्या दाव्यांसाठी केंद्राने पतंजलीविरुद्ध कारवाई का केली नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

पुढारी खुर्चीत मश्गूल


तालुक्यात सध्या लोकसभा निवडणुकीने विविध राजकीय पक्षाचे नेते, पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांना गोंजारत असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच वर्षात त्यांना कधीच मतदाराची आठवण आली नाही. तेच मंडळी स्वताची खुर्ची टिकवण्यासाठी जीवाच रान करीत आहेत. हेच परिश्रम अगोदरपासून घेतले असते तर दारोमदार फिरण्याची वेळ आली नसती, अशी राजकीय जाणकार मंडळीत चर्चा सुरू आहे. तुम्ही तुमची सत्ता काबीज करा पण मतदारांच्या मुलभूत गरजांकडे तितक्याच तन्मयतेने पाहणे गरजेचे आहे. असे मत सुजाण मतदारांकडून व्यक्त होत आहे.

Lok Sabha Election 2024 Latest News Bhokar Nanded 
Marathi Political Satire BJP NCP Shivsena Congress News
Fact Check: नरसिंह राव यांना 'भारतरत्न' प्रदान करताना मल्लिकार्जून खर्गे यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत हा दावा खोटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.