Electric Shock : महावितरणचा अनागोंदी कारभार ! विद्युत तारेचा स्पर्श होऊन नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यु

नांदेड शहरातील नवीन वसाहतीमधील बांधकाम करण्यात येणाऱ्या घरावर वीज पुरवठा चालू असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.
Electric Shock
Electric ShockSakal
Updated on

लोहा : महावितरणाची माळेगाव यात्रा सब स्टेशनला पुरविण्यात येणारी मोठी लाईन तात्पुरती बंद करण्यात आली होती. तेव्हा लोहा शहरात वीज पुरवठा सुरू असलेली लाईन होती. त्यावेळी विजेच्या तारेचा धक्का लागल्याने नऊ वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. आरडाओरडा करत असताना आईने आपल्या कडेवर असलेल्या बाळासह घेऊन चिकटलेल्या मुलास काढण्याचा प्रयत्न केला असता तेही जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. नऊ) सकाळी साडेआठ वाजता लोहा शहरातील तलाठी कॉलनी येथे घडली.

जखमी अवस्थेत आईने तारेसह मुलाला स्पर्श करतात चिकटून बसली. तिच्यासोबत तिच्याकडे नऊ महिन्याचा बाळही चिकटून बसल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. घरी पुरूष कोणीच नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेजारी असलेल्या नागरिकांनी लाकडाची मदत घेत दोघांचे प्राण वाचविण्यात यश मिळवले.

शहरातील तलाठी कॉलनी येथील अथर्व गोविंद देवकते (वय नऊ) हा गच्चीवर खेळत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील गोविंद देवकते हे गावाकडे शेती कामासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. जखमी असलेली आई सोनुबाई देवकते आणि नऊ महिन्याचे बाळ यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, महावितरणचे शाखा अभियंता श्री दवंडे हे मोबाईल सातत्याने बंद ठेवत होते. त्यामुळे नागरिकांनी संतापून मृत्यू पावलेल्या बालकाचा मृतदेह पोलीस ठाण्यामध्ये नेला. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, अशी भूमिका घेतली.

Electric Shock
Electricity Connection : पुणे जिल्ह्यात ३ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा

यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी मध्यस्थी करून गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. लोहा शहरातील नवीन वसाहतीमधील बांधकाम करण्यात येणाऱ्या घरावर वीज पुरवठा चालू असल्याच्या अनेक तक्रारीचा पाढा या ठिकाणी नागरिकांनी वाचून दाखवला. महावितरण अशा बाबतीत कुठलीच कारवाई करत नसल्याचे तहसीलदार यांना सांगण्यात आले. त्यानंतर आकस्मिक मृत्यूमुखी पडलेल्या अथर्वचा मृतदेह आरोग्य विभागाकडे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे लोहा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Electric Shock
Electric vehicle : बिनधास्त घ्या, इलेक्ट्रीक गाडी! महावितरणच्या पुढाकाराने राज्यात उभारणार ३२१४ चार्जिंग स्टेशन

महावितरणचा अनागोंदी कारभार

लोहा शहरातील तलाठी कॉलनीमधून माळेगावच्या पुरविण्यात येणारी मोठी लाईन आहे. मात्र, गेल्या काही महिन्यापासून या लाईनमधील वीजप्रवाह बंद करण्यात आला आहे. लाईन अनेक बांधकाम केलेल्या घरावरून गेली असली तरी अनेकदा तक्रार करूनही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मनावर घेतले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.