मोठी दुर्घटना टळली, मुदखेडजवळ जिलेटिनच्या गाडीचा स्फोट

भोकर येथून मुदखेड मार्गे वैजापूर पार्डी रस्त्याने बारडकडे जिलेटिन वाहतूक करणारी गाडी जात असताना या गाडीचे मागचे चाक गळून पडले व गाडी पलटी खाल्ली.
जिलेटीनचा स्फओट झाल्यानंतर वीस फुट खोल खड्डा पडला
जिलेटीनचा स्फओट झाल्यानंतर वीस फुट खोल खड्डा पडला
Updated on

मुदखेड ( जिल्हा नांदेड ) : मुदखेडपासून तीन किलोमीटर अंतरावर मुदखेड- पारडी या रस्त्यावर जिलेटिनच्या कांड्या घेऊन जाणाऱ्या गाडीचा स्फोटझाला. यात अपघातग्रस्त वाहनाचा चुराडा झाला. स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज झाला व स्फोट झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील शेतकऱ्यांच्या आखाड्यावरचे टिन पत्रे, तर कोणाचे बांधकाम कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटामध्ये चालकासह परिसरातील युवा शेतकरी जखमी झाला असल्याची माहिती आहे. हा स्फोट मंगळवारी (ता. एक जून) सकाळी नऊच्या सुमारास झाला.

भोकर येथून मुदखेड मार्गे वैजापूर पार्डी रस्त्याने बारडकडे जिलेटिन वाहतूक करणारी गाडी जात असताना या गाडीचे मागचे चाक गळून पडले व गाडी पलटी खाल्ली. त्यामध्ये गाडीचा चालक अडकला होता. त्यावेळी जवळच असलेल्या काही शेतकऱ्यांनी या गाडीतून चालकास सुखरुप बाहेर काढले. त्यावेळी चालकाच्या लक्षात आले की गाडीमध्ये असलेले जिलेटीन आता पेट घेतात तेव्हा ताबडतोब या चालकाने शेतकऱ्यांना व परिसरातील लोकांना दूर जाण्यास सांगितले व तो देखील दूर पळून गेला. काही वेळातच या जिलेटिन वाहतूक करणाऱ्या गाडीचा मोठा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झाले. अवशेषही इतरत्र जाऊन पडले या स्फोटामुळे पलटी खाल्लेल्या शेतामध्ये वीस ते पंचवीस फुटाचा मोठा खड्डा पडला असून या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. तर परिसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या आखाड्यावरचे पत्रे व बांधकाम केलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा - गटविकास अधिकारी आल्याशिवाय कुलूप काढणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतला होता

घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या बाळू गोडवान या शेतकऱ्यास स्फोटात उडालेल्या दगड लागून तो जखमी झाला आहे. सदरील घटनाही सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान मोडवान यांच्या शेताजवळ घडली असून या घटनेमध्ये गाडीचे तुकडे तुकडे झाले असून हे तुकडे व शेतातील माती दगड 200 मीटर अंतरापर्यंत दूर उडून पडले आहेत. यात झालेल्या प्रचंड आवाजाने परिसरातील शेतकरी व शेतमजूर भयभीत होऊन पळत सुटले होते. मजूर व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान आवाज ऐकूण मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी ताबडतोब आपला पोलिस फौजफाटा सोबत घेऊन घटना घडल्या च्या दिशेने धाव घेतली. परिसरात निर्माण झालेली शेतकरी व मजुरांमध्ये झालेली भिती दूर करुन लोकांना धीर दिला.

सदरील घटनेत नामशेष झालेली गाडी ही कोणाची होती या गाडीमध्ये जिलेटिन व स्फोटक पदार्थ किती प्रमाणात होते. वाहतुकीची परवानगी क्षमता किती प्रमाणात आहे. याची चौकशी चालू असल्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी यावेळी सांगितले.

आज सकाळी झालेल्या घटनेच्या स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्याने परिसरात जवळपास दहा किलोमीटर अंतरावर हा आवाज दुमदुमला या आवाजामुळे मुदखेड शहरासह परिसरातील नागरिक मोठे भयभीत झाले होते.

सदरील घटनाही मुदखेड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर घडली सुदैवाने ही घटना मुदखेड शहरात किंवा ग्रामीण भागातल्या एखाद्या खेड्यात वस्तीमध्ये घडली असती तर प्रचंड प्रमाणात हानी झाली असती. या घटनेतील स्फोटामुळे मोठा अनर्थ टळला असून घटनेची चौकशी चालू असल्याचे समजते.

येथे क्लिक करा - माणूसकीचे दर्शन : नायगावच्या मयत शिक्षकाच्या कुटुंबाला सहकारी मित्रांकडून साडेतीन लाखाची मदत

मुदखेड शहरामध्ये उमरी रोडवरती सीआरपीएफ केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या वस्तीमध्ये एका राजस्थानी व्यक्तीचे गोडाऊन असून या ठिकाणी ब्लास्टिंग करणाऱ्या जवळपास दहा ते पंधरा गाड्या दररोज रात्रीला उभ्या असतात. व या राजस्थानी व्यक्तीकडे जिलेटिनचा प्रचंड साठा आढळून येतो. या व्यक्तीकडे जिलेटिन बाळगण्याची क्षमता किती आहे व तो जिलेटिन व स्फोटक पदार्थ किती प्रमाणात साठवणूक करुन ठेवतो याची चौकशी करावी व या राजस्थानी साठवणूक दाराची चौकशी करुन या व्यक्तीचे गोडाऊन मुदखेड शहराच्या चार ते पाच किलोमीटर बाहेर हलवावे अशी मागणी मुदखेड शहरातील उमरी रोड परिसरात असलेल्या गाडी कॉलनी व बंजारा वस्तीतील नागरिकांकडून होत आहे.

मुदखेड पासून तीन किलोमीटर अंतरावर आज सकाळी झालेल्या पिकप गाडी क्रमांक एम. एच.26, एच 0358 या गाडीच्या स्फोटाची माहिती जिल्ह्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, भोकरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांना मिळताच यांनी नुकतीच घटनास्थळी भेट देऊन स्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान या स्फोटांमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या की अन्य कोणते स्फोटक पदार्थ होते हे माहिती करून घेण्यासाठी श्वानपथक व सदरील जागेवरचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिली असल्याचे समजते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.