Gram Panchayat Election: फक्त उमेदवारच करतायत प्रचार; मतदार मात्र शेतात

In Malegaon, only candidates are campaigning and voters are roaming the fields
In Malegaon, only candidates are campaigning and voters are roaming the fields
Updated on

मालेगाव (नांदेड) : येत्या शुक्रवारी (ता.15) जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेण्याकडे उमेदवारांचा कल वाढला आहे. मात्र उमेदवार गावात मतदार शेतात असे चित्र आहे.

मालेगाव परिसरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. सध्या शेतीची कामे वाढली असल्यामुळे मतदार शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे उमेदवार गावात आणि मतदार शेतात अशी स्थिती मालेगावमध्ये बनली आहे. उमेदवार प्रचार करण्यासाठी सकाळची आणि सायंकाळची वेळ निवडत आहे. निवडणुकीमध्ये उमेदवारांनी माघार घेतल्यापासून प्रचाराचा जोर अजूनच वाढला आहे. प्रत्येक उमेदवाराला आपल्या विरोधी उमेदवार किती प्रबळ आहे, याचा अंदाज आलेला आहे. 

काही वार्डातील मतदारांची संख्या अधिक तर काही वर्षांमध्ये कमी आहे. त्यातच भाऊबंदकी, मित्र परिवार, नातेवाईक यांचाही विचार अगत्याने होऊ लागला आहे. मोठ्या निवडणुकीत मतदारांना एक-दोन वेळाच भेटण्याची संधी उमेदवारांना मिळत असते. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच गणिती वेगळी असतात. या निवडणुकीत जास्तीत जास्त वेळा मतदारांना भेटण्याकडे उमेदवारांचा कल असतो. मात्र, यावेळी मतदार आपल्या कितीही जवळचे असले तरी त्यांना भेटण्यास उमेदवारांना अडचणी येऊ लागल्या आहेत, त्यात कारणही तसेच आहे. 

सध्या मालेगाव परिसरात शेतीची कामे, लग्नसराई मोठ्या प्रमाणात सुरू असून मजूर वर्ग शेतकरीवर्ग काही मंडळी सकाळपासूनच शेतामध्ये किंवा लग्नामध्ये हजेरी लावत आहेत. तसेच शेतकरी वर्ग, मजूर वर्ग देखील शेतामध्ये काम करून संध्याकाळीच घरी परतत आहे. त्यामुळे गावांमध्ये दुपारच्या वेळी फक्त जेष्ठ मंडळी आणि शाळा बंद असल्यामुळे लहान मुले दिसत आहेत. त्यामुळे उमेदवार गावात आणि मतदार शेतात अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

माझे मत तुम्हालाच

मालेगाव शेतात राहणाऱ्या मतदारांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे उमेदवार शेतात जाऊन राहणार्‍या मतदारांना भेटण्यासाठी शेतामध्ये देखील जात आहेत. शेतात जाताना शेतात काम करत असणाऱ्या मतदारांना देखील उमेदवार भेटत आहे. तुम्ही आम्हाला मतदान करा, असे आवाहन करत आहेत. मतदार देखील मोठा भाऊ खाताना दिसत आहेत. प्रत्येक उमेदवाराला माझे माझे मत तुम्हालाच असेच मतदार सांगत आहेत.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()