“पोषण पुनर्वसन केंद्र” सुरु करुन कुपोषणावर मात करावी- डॉ. बेलखोडे

शुक्रवारी (ता. २८) राज्याचे प्रधान सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्र संवादाद्वारे झालेल्या बैठकीत राज्याच्या आदिवासी भागातील आरोग्य परिस्थीतीचा व प्रामुख्याने कोरोना संदर्भात व कुपोषणाच्या बाबतीत आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
डाॅ. अशोक बेलखोडे
डाॅ. अशोक बेलखोडे
Updated on

किनवट ( जिल्हा नांदेड ) : येथे “पोषण पुनर्वसन केंद्र” सुरू करुन कुपोषणावर मात करावी, “तज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागा” भरून आरोग्य सेवेचा दर्जा वाढवावा व करोना प्रतिबंधासाठी “आदिवासी भागाकडे विशेष लक्ष” द्यावे, अशी मागणी राज्यस्तरीय गाभा (कुपोषण ) समितीचे सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी केली आहे.

शुक्रवारी (ता. २८) राज्याचे प्रधान सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्र संवादाद्वारे झालेल्या बैठकीत राज्याच्या आदिवासी भागातील आरोग्य परिस्थीतीचा व प्रामुख्याने कोरोना संदर्भात व कुपोषणाच्या बाबतीत आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

येऊ घातलेला पावसाळा व कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता वरील बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यात आरोग्य खात्यातील रिक्त जागा भरणे, पोषण आहार मुलांपर्यंत पोहचविणे, आजारी मुलांची विशेष काळजी घेणे इत्यादी बाबतीत चर्चा होऊन मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा - शुक्रवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास साडेआठ लाख रुपयांची बॅग दोन चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून जबरीने चोरली म्हणून पोलिस ठाण्यात आलेल्या व्यक्तीची सत्यता पडताळणी केली असता कांही मिनिटातच हा प्रकार उघड झाला.

मराठवाड्याचे आदिवासी भाग म्हणुन प्रतिनिधीत्‍व करणाऱ्या किनवट- माहूर तालुक्यासंबंधी या समितीचे सदस्य व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे यांनी वरील मागण्यांसेाबतच तालुक्यातील आरोग्य विषयक बाबींचा उहापोह केला. त्यात रिक्त जागा भरतांना त्या प्रथम सध्या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांमधुनच भरण्यात याव्यात, तज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागा भराव्यात, तसेच महाराष्ट्राच्या आदिवासी भागातील करोनाचे थैमान लक्षात घेता आदिवासी भागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

आदिवासी समाजात अंधश्रध्दा व गैरसमजुती जास्त प्रमाणात असल्यामुळे जणजागरण व समुपदेशनासारखे कार्यक्रम हातात घेणे तसेच अत्यंत गरजेचे वैद्यकीय उपचारासाठी १५० किमी अंतर पार करावे लागत असल्याने किनवट व माहूर येथे ह्या तज्ञांच्या उपचार सुविधा उपलब्ध करण्याबाबत त्यांनी प्रधान सचिव यांच्या लक्षात आणून दिले.

येथे क्लिक करा - देवस्थानालाही न सोडणारा लाचखोर तलाठी विजयकुमार कुलकर्णी चार हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात.

सोबतच कुपोषणाला प्रतिबंध घालण्यासाठी अत्यंत आवश्यक असे “पोषण पुनर्वसन केंद्र” जे की किनवटला असायला पाहिजे ते सध्या नांदेड येथे कागदोपत्री कार्यरत आहे. (आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्रासारखे ) ही चूक दुरुस्त करुन ते केंद्र किनवट येथे कार्यान्वीत करावे व आदिवासी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी संबंधीतांकडे केली. या मागण्यांना प्रधान सचिव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नांदेडचे जिल्हाधिकारी गाभा समितीच्या संदर्भात लक्ष ठेवुन असतात व बैठका नियमीत घेतात या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

दुरचित्रसंवादाद्वारे झालेल्या या बैठकीत स्वत: प्रधान सचिव यांच्या सोबत आरोग्य खात्याचे सचिव श्री. व्यास, माता बाल संगोपण खात्याचे सचिव, डॉ. अभय बंग, संचालक डॉ. तात्याराव लहाने, पुर्णिमा उपाध्याय नागपूर, ब्रायन लोबो पालघर, बंड्या साने अमरावती, डॉ. अशोक बेलखोडे किनवट, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचेसह एकुण १७ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.