Nanded news : अनेक बेरोजगारांना मिळाली रोजगारातून उभारी

नांदेड वाघाळा महापालिकेची मदत; पीएम - स्वनिधी योजनेतून कर्ज वाटप
nanded
nanded sakal
Updated on

नांदेड : राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने नांदेड वाघाळा महापालिकेने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम - स्व निधी) योजनेतून अनेक बेरोजगारांना उभारी मिळाली आहे. त्यातून अनेकांनी कामाला सुरूवात केली आहे. शहरातील नऊ हजार २६३ फेरीवाले, पथविक्रेते यांना विविध बँकेच्या माध्यमातून आठ कोटी १९ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्यामुळे त्यांना रोजगारासाठी मदत मिळाली आहे.

त्याचबरोबर त्यांनी डिजीटल माध्यमातून व्यवहार केल्यामुळे त्यांना कॅशबॅकही मिळाला आहे. अजूनही नव्याने आलेल्या फेरीवाल्यांच्या ऑनलाईन अर्जावर कर्ज देण्याबाबतची कार्यवाही चालू आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह या विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा अग्रणी बँक व इतर बॅंका यांनी पुढाकार घेतला आहे.

nanded
Nanded News : वाढत्या गुन्हेगारीवर हवा पोलिसांचा अंकुश

कोरोना संसर्ग काळात लॉकडाऊनमध्ये शहरातील मोडकळीस आलेल्या फेरीवाल्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवलाची तातडीने गरज होती. त्यासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम - स्व निधी) या योजनेची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार या योजनेतून पथ विक्रेत्यांना सुक्ष्म पतपुरवठा करण्यात येत असून त्यामध्ये दहा हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध केले जात आहे. त्यानुसार नांदेड शहरातील अनेक बेरोजगारांनी त्याचा लाभ घेतला असून छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यात भाजीपाला विक्रेत्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर एसबीआय, बॅक आॅफ बडोदा, बॅक आॅफ महाराष्ट्र आदी बॅंकांची मदत होत आहे.

अनेकांनी फेडले कर्ज...

नांदेड शहरामध्ये या योजनेतंर्गत आठ हजार १९३ लाभार्थ्यांना दहा हजार रुपयेप्रमाणे कर्ज देण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा ९८४ लाभार्थ्यांना पुन्हा २० हजार रुपये प्रमाणे कर्ज देण्यात आले आहे. तसेच ज्यांनी २० हजाराची परतफेड केली अशा ८६ लाभार्थ्यांना ५० हजार रुपये प्रमाणे कर्ज वाटप केले आहे. नांदेड शहरातील नऊ हजार २६३ फेरीवाल्यांसाठी बँकेने एकूण आठ कोटी १९ लाख एवढे कर्ज वाटप केले आहे. तसेच अजूनही कर्ज देण्याबाबतची कार्यवाही चालू असल्याची माहिती नोडल आॅफिसर प्रविण मगरे यांनी दिली आहे.

nanded
Nanded News : ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार!

दिनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान २०१५ अंतर्गत पीएम - स्वनिधी योजना राज्यातील प्रत्येक शहरामध्ये पथविक्री करत असलेल्या सर्व पात्र फेरीवाल्यांना लागू आहे. या योजनेसाठी कोणत्याही ऑनलाईन सुविधा केंद्रावर ऑनलाईन अर्ज करता येतो. सदर कर्ज विनातारण असून घेतलेल्या कर्जाची एका वर्षात परतफेड करावयाची आहे. विहित कालावधीत परतफेड केलेल्या फेरीवाल्यांना वाढीव मयदिसह म्हणजेच २० आणि ५० हजार रुपये पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. तसेच डीजीटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना कॅश बॅक सुविधा देण्यात येत आहे.

- अशोक सुर्यवंशी, नोडल आॅफिसर, महापालिका.दिनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान २०१५ अंतर्गत पीएम - स्वनिधी योजना राज्यातील प्रत्येक शहरामध्ये पथविक्री करत असलेल्या सर्व पात्र फेरीवाल्यांना लागू आहे. या योजनेसाठी कोणत्याही ऑनलाईन सुविधा केंद्रावर ऑनलाईन अर्ज करता येतो. सदर कर्ज विनातारण असून घेतलेल्या कर्जाची एका वर्षात परतफेड करावयाची आहे. विहित कालावधीत परतफेड केलेल्या फेरीवाल्यांना वाढीव मयदिसह म्हणजेच २० आणि ५० हजार रुपये पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. तसेच डीजीटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना कॅश बॅक सुविधा देण्यात येत आहे.

- अशोक सुर्यवंशी,नोडल अधिकारी , महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.