अर्धापूर : सकल मराठा समाजाच्या तरूणांच्या रोषाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा सामोरे जावे लागले आहे.कोंढा (ता अर्धापूर जिल्हा नांदेड) येथे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण गाठी भेटी घेण्यासाठी सोमवारी (ता एक) आले आसता सकल मराठा समाजाच्या तरुणांनी गाडीला घेराव घालून एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे आशा घोषणा दिल्या.
सकल मराठा समाजाच्या तरूणांचा रोष पाहुन अशोक चव्हाणांना काढता पाय घ्यावा लागला.पोलीसांनी तरुणांना गाडी जवळून दुर करून चव्हाणांना सुरक्षित गावा बाहेर काढले. अर्धापूर तालुक्यात मराठा समाजाच्या आरक्षणची धग कायम असून सकल असुन सकल मराठा समाजाच्या तरूणांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वी नांदेडचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले आसता अज्ञातांनी कारच्या काचा फोडल्या होत्या.
अर्धापूर तालुक्यात पुढाऱ्यांना गावं बंदीचा फटका बसत आहे.अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, कामठा आदी गावांना अशोक चव्हाण यांनी भेटी दिल्या. कोंढा येथील माजी सरपंच रामराव कदम यांच्या निवासस्थानी आले होते.याची कुणकुण गावातील सकल मराठा समाजाच्या तरूणांना लागली व ते गावातील मारुती मंदिर परिसरात जमा झाले.
या परिसरात अशोक चव्हाण यांच्या वाहणांचा ताफा येताच तरुणांनी आडवला.तरूणांनी प्रचंड अशी घोषणाबाजी करत अशोक चव्हाणांची गाडी अडवली व मराठा आरक्षणाचा जाब विचारला.
गाडी भोवती गर्दी झाल्याने पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून तरूणांना गाडी पासून दूर केले व रस्ता मोकळा करून अशोक चव्हाणांना गावाबाहेर नेले. या आचनक झालेल्या घटनेमुळे पोलीसांची एकच तारांबळ उडाली होती.गावात आलेला वाहनांचा ताफा कसाबसा गावाबाहेर गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.