नांदेडमधून निघणार मूक मोर्चा, संभाजीराजे राहणार उपस्थित

सकाळ क्रांती मूक मोर्चा
सकाळ क्रांती मूक मोर्चा
Updated on

नवीन नांदेड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) शुक्रवारपासून (ता.२०) राज्यभर मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात नांदेड येथून होणार आहे. छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांच्या उपस्थितीत सुरू होणाऱ्या या क्रांतिकारी आंदोलनाने अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला जाईल आणि मराठा आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष केला जाईल, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. जर सरकारने मराठा समाजाच्या या मागण्या मान्य केल्या नाही. त्यानंतर लाल महाल, पुणे ते मुंबई विधानभवनपर्यंत लाँग मार्च होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ज्या जिल्ह्यात आंदोलन होईल. त्यानंतर तिथेच लाँग मार्चच्या तयारी संदर्भात प्रमुख पदाधिकारी सोबत बैठक पार पडेल. सकल मराठा समाजाने पुकारलेल्या या आंदोलनाचा (Maratha Kranti Muk Morcha) इष्ट परिणाम साधला जावा म्हणून आंदोलनाचे नेतृत्व केंद्र आणि राज्य सरकारच्या या मुद्द्यावर असलेल्या जबाबदारीचे वर्गीकरण करून ती प्रामाणिकपणे पार पाडून मराठा समाजाला न्याय देण्याचे नीतिमत्ता सिद्ध करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ क्रांती मूक मोर्चा
शहराचे नाव बदलण्यासाठी यायचे,मग तुम्ही औरंगाबादला दिले काय : जलील

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका (रिव्ह्यू पिटीशन ) दाखल करावी. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या शिफारशींचा बचाव करावा, न्यायालयाने रिव्ह्यू पिटीशन अमान्य केल्यास तर दुसरा पर्याय क्युरेटिंग पिटीशनचा पर्याय उपलब्ध करावा.

सकाळ क्रांती मूक मोर्चा
कोरोनामुळे यंदाही दत्तप्रभुंची प्रसिद्ध परिक्रमा यात्रा रद्द

आंदोलनाची आचारसंहिता

दरम्यान ता. १६ जूनपासून मराठा क्रांती मूक आंदोलनाचे दुसरे पर्व राजश्री शाहू समाधीस्थळ कोल्हापूर येथून प्रारंभ झाला आहे. त्याचे आचारसंहिता ही जाहीर करण्यात आली असून काळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून दंडावर काळी फीत बांधून येणे, काळा मास्क वापरणे, असा गणवेश घालूनच मराठा आंदोलकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळी छत्री सॅनिटायझर सोबत ठेवून त्याचा वापर करणे, आंदोलनस्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन न करणे, नियम कसोटीने पाळणे अशी सक्त ताकीद समन्वयकांनी दिली आहे. मराठा समाजाने यापूर्वी ५८ मूक मोर्चा वेळी आपल्या वर्तनाने आदर्श निर्माण केला होता. तोच आदर्श घेऊन यापुढेही वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. मराठा समाज हा लढवय्या समाज आहे. परंतु आपली ती शक्ती विचारपूर्वक वापरणे काळाची गरज आहे, असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.