Nanded Traffic : नांदेड शहरात आज वाहतूक मार्गात बदल; मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी लाखो समाजबांधव येणार

Nanded Traffic Update : नांदेड शहरात सोमवारी (ता. ८) सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.
Nanded Traffic
Nanded TrafficSakal
Updated on

Nanded News : नांदेड शहरात सोमवारी (ता. ८) सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. संवाद रॅली ही शहरात राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत जाणार असून, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ जरांगे पाटील हे रॅलीला संबोधित करणार आहेत.

आरक्षण जनजागृती रॅलीसाठी जिल्ह्यातून वेगवेगळ्या मार्गांनी मोठ्या प्रमाणात वाहने येण्याची शक्यता आहे. वाहनधारकांना व रहदारीस अडथळा होणार नाही, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीसाठी हे मार्ग बंद

  • तरोडा नाका व शिवमंदिरकडून राज कॉर्नर ते वजिराबाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येण्याचा मार्ग.

  • राज कॉर्नर ते वर्कशॉप टी पॉइंट ते आयटीआय व वजिराबाद चौक.

  • भाग्यनगर चौकाकडून वर्कशॉप.

  • महात्मा गांधी पुतळा, सोनू कॉर्नर ते वजिराबाद चौक-कला मंदिर, शिवाजीनगर ते आयटीआय चौक ते राज कॉर्नर.

  • रविनगर कौठा-गोवर्धन घाट पूल ते वजिराबाद चौक ते राज कॉर्नर.

  • रेल्वेस्टेशनकडून छत्रपती शिवाजी महाराज स्मारककडे.

  • महावीर चौक व गांधी पुतळ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक.

Nanded Traffic
Nanded News : शिक्षण विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावी; आमदार जवळगावकरांच्या जिल्हा परिषद सीईओंना सूचना

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

  • बर्की चौकडून वजिराबाद चौकाकडे येणारी वाहतूक महावीर चौक-चिखलवाडी चौक-हिंगोलीगेट मार्गाचा वापर करावा.

  • गोवर्धनघाट पुलावरून येणारी वाहतूक व वजिराबाद चौकाकडून शिवाजीनगर-आयटीआय-वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक तिरंगा चौक-पोलिस मुख्यालयामार्गे खडकपुरा-लालवाडी-अंडरब्रीज मार्ग शिवाजीनगर-पिवळी गिरणी-गणेशनगर वाय पॉइंट जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल.

  • राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक चैतन्यनगर-पीरबुऱ्हाण-भाग्यनगर-आनंदनगर- नागार्जुना टी पॉइंट-अण्णा भाऊ साठे पुतळा-यात्री निवास पोलिस चौकी, अबचलनगर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापर करतील.

  • सिडको-हडकोकडून येणारी वाहतूक रविनगर, कौठा, गोवर्धन घाट- तिरंगा चौक-पोलिस मुख्यालय मार्ग खडकपुरा-लालवाडी-अंडरब्रीज मार्ग शिवाजीनगर-पिवळी गिरणी, गणेशनगर-वाय पॉइंट जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल.

शहरात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. शहरातील सर्व नागरिकांनी नेमून दिलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

— साहेबराव गुट्टे, (पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.