Nanded News
Nanded Newssakal

Nanded News : पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांचा मराठी पत्रकार संघटनेतर्फे निषेध

रस्त्यात होणाऱ्या हाणामारीची माहिती घेताना पत्रकार राहूल गजेंद्रगडकर यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या तरूणांनी हल्ला केला. ही घटना रविवारी (ता. तीन) सायंकाळी आयटीआय चौकातील भू विकास बॅकसमोर घडली.
Published on

नांदेड : रस्त्यात होणाऱ्या हाणामारीची माहिती घेताना पत्रकार राहूल गजेंद्रगडकर यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या तरूणांनी हल्ला केला. ही घटना रविवारी (ता. तीन) सायंकाळी आयटीआय चौकातील भू विकास बॅकसमोर घडली.

या घटनेचा निषेध करत हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. दोन पॅनलमध्ये लढत होती. आयटीआय चौकातील जुनी भू विकास बैंक इमारतीत रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पतसंस्थेचा निकाल घोषीत झाला. पॅनल पराभुत झाल्याचे कळताच भर रस्त्यावरच हाणामारी सुरू झाली.

Nanded News
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

त्यामुळे या घटनेची माहिती घेत मारहाणीचे फोटो घेण्यासाठी प्रतिनिधी राहूल गजेंद्रगडकर घटनास्थळी हजर होते. हे पाहताच एका टोळक्याने गजेंद्रगडकर यांना मारहाण सुरू केली. तेव्हा येथे उपस्थित असलेले पत्रकार संतोष पांडागळे यांनी गजेंद्रगडकर यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पत्रकार संघटनेच्या वतीने याबाबत निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.