Nanded : माता साहिब जन्मोत्सवात भाविकांची हजेरी

नेजाबाजी कवायती उत्साहात; आज नगरकीर्तन यात्रा
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड : येथून जवळच असलेल्या गुरुद्वारा माता साहेब देवाजी येथे सुरु असलेल्या ३४१ व्या माता साहिब देवाजी जन्मोत्सव कार्यक्रमात शनिवारी मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती. किर्तन दरबार आणि नेजाबाजी कवायती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रविवारी नगरकिर्तन यात्रेने समारोप होणार आहे.

शनिवारी माता साहिब देवाजी जन्मोत्सवाचा दुसरा दिवस होता. शनिवारी सकाळी दहा वाजता किर्तन दरबार धार्मिक दिवाण कार्यक्रमास सुरुवात झाली. श्री गुरुग्रंथ साहेब यांच्या सन्निध्यात गुरुबाणी पठण, कथा आणि किर्तन या सारखे कार्यक्रम पार पडले. मंचावर संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी मातासाहेब वाले आणि विविध दल पंथाचे पदाधिकारी व धार्मिक क्षेत्रातील प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी भाई देविंदरसिंघजी निरमाण (अमृतसर), भाई जीवनसिंघजी रागी (लुधीयाना), भाई जरनैलसिंघजी हजूरी, कवीश्वर भाई सुखबीरसिंघ, ज्ञानी हरिंदरसिंघजी, गुरुद्वारा माता साहेब येथील स्थानीक रागी जत्थे यांनी कार्यक्रम सादर केले.

सायंकाळी निहंग सिंघांच्या विविध दलांच्या वतीने नेजाबाजी तसेच घोड्यांच्या कवायती सादर करण्यात आल्या. नेजाबाजीचे थरार पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. रविवारी जन्मोत्सव कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. सकाळी किर्तन दरबार आणि समापन कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी अडीच वाजता माता साहेब येथून नगर किर्तन यात्रा काढण्यात येणार आहे. नगर किर्तन यात्रा माता साहेब ते नांदेड येथील तख्त सचखंड हजुरसाहिब येथे दाखल झाल्यानंतर यात्रेचे विसर्जन होईल, अशी माहिती संतबाबा तेजासिंघजी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.