नांदेड : जिल्ह्यातील ४५ हजार १०७ महिलांनी पंतप्रधान मातृवंदना योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी माहिती दिली.
डॉ. शिंदे म्हणाले की, भारतात दर तीन स्त्रियांच्या मागे एक स्त्री कुपोषित आढळून येते. गरोदरपणातील महिलांच्या कुपोषणामुळे जन्माला येणारे बाळ देखील कमी वजनाचे व कुपोषित होते. गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यास त्यांचे जन्माला येणार बाळ सुदृढ व निरोगी जन्माला यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या तालुक्यातील महिलांना लाभ
या योजनेच्या माध्यमातून अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, दहगाव, किनवट, माहूर, लोहा, मुखेड, नायगाव, माहूर, कंधार, उमरी, मुदखेड, हिमायतनगर यासह नांदेड वाघाळा महापालिका येथील ४५ हजार १०७ महिलांना या योजनेतुन १७ कोटी ३७ लाख ४५ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या मध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ३७ हजार ९४० तर नांदेड वाघाळा महापालिका हद्दीतील सहा हजार ८७६ गर्भवती व स्तनदा मातांचा समावेश असल्याचे डॉ.शिंदे यांनी सांगितले.
असा होतो कुपोषणाचा जन्म
ग्रमीण भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला बाळंतपणानंतर कामावर परतल्याने त्यांच्या बाळाला मातेचे पुरेशे दूध मिळत नाही. दरम्यान बाळाचे पोषण होत नाही. यातूनच कुपोषणाचा जन्म होतो. बाळाचे होणारे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान मातृ वंदना योजना सुरू केली आहे.
--
असा दिला जातो लाभ
ज्यांच्याकडे जातीचा दाखला नाही व शासकीय सेवेत नाहीत अशा सर्व गर्भवती महिला व मातांना देखील या योजनेचा सहज लाभ घेता येतो. त्यांच्यासाठी उत्पन्नाची देखील अट नाही. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद करणे गरजेचे आहे. रुग्णालयाकडे नोंद असलेल्या गर्भवती मातांना दोन हजार रुपयाचा पहिला हप्ता मदत म्हणून दिला जातो. सहा महिण्यांच्या तपासणी नंतर दोन हजार रुपयाचा दुसरा हप्ता तर, बाळाच्या जन्मानंतर लसिकरणाच्या वेळी पुन्हा एक हजार रुपयाचा तिसरा हप्ता दिला जातो.
पहिल्या वेळेस गर्भवती असलेल्या मातांची खासगी रुग्णालयात बाळांत महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जातो. परंतु त्यासाठी गर्भवतीमातांनी पहिल्या शंभर दिवसाच्या आत नोंदणी व तपासण्यापूर्ण करणे गरजेचे आहे. लाभार्थ्याकडे पतीचे आधार कार्ड, स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे.
आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधल्यास या योजनेचा लाभ
पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील गर्भवती महिलांनी नजिकच्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशावर किंवा शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधल्यास या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे.
- डॉ. बी. एम. शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी) .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.