उपचारासाठी मेट्रो सिटी, नांदेडच्या विकासाची कोरी पाटी...

अशोक चव्हाण - प्रताप पाटील चिखलीकर
अशोक चव्हाण - प्रताप पाटील चिखलीकर
Updated on

नांदेड - मराठवाड्याच्या एका टोकाला नांदेड वसलेले असून नांदेडला मोठा इतिहास आहे. नांदेडच्या मातीने अनेकांना मोठे केले. राजकारणासह सर्वच क्षेत्रात अनेक दिग्गज घडले. मात्र, असे असले तरी मी नांदेडच्या मातीतला असलो तरी मी नांदेडला काय दिले? असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा त्याचे बहुतांशी जणांकडून उत्तर नाही असेच येते. त्यामुळे ‘उपचारासाठी मेट्रो सिटी, नांदेडच्या विकासाची कोरी पाटी...’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ती आणखी अधोरेखीत झाली आहे. 

नांदेड शहर आणि जिल्ह्यात सुरवातीच्या एक दीड महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला नाही. नंतर मात्र हळूहळू कोरोनाचा रुग्ण सापडू लागले. सुरवातीला नांदेड शहरापुरता असलेले कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यातही ग्रामिण भागात पसरण्यास सुरुवात झाली. एवढेच नव्हे तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील दिग्गजांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील काही जणांनी नांदेडला उपचार घेतले तर काहींनी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद, मुंबईला उपचार घेणे पसंद केले. त्यामुळे नांदेडमध्ये होणाऱ्या उपचाराची चर्चा सुरु झाली. 

अत्याधुनिक रुग्णालयाची गरज
मागील काही वर्षात नांदेडला मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संकुल आणि दवाखाने उभारण्यात आले. त्यामुळे नांदेडसह परभणी, हिंगोली तसेच यवतमाळ या जिल्ह्यातील अनेकांची सोय झाली. मात्र, आरोग्यासाठी सोयी सुविधा देत असताना सर्वसामान्य आणि गरिबांकडे अधिक लक्ष देण्याची गरज होती. त्याकडे दुर्लक्ष होते. नांदेडला गेल्या अनेक वर्षापासून अत्याधुनिक आणि अद्ययावत असे मोठे आरोग्य रुग्णालय व्हावे, अशी मागणी होत आहे. मात्र, त्याची पूर्तता अजूनही झाली नाही. आज नांदेडला अत्याधुनिक रुग्णालय झाले असते तर निच्शितच कोरोनावर मात करण्यासाठी त्याचा फायदा सर्वसामान्य आणि गोरगरिबांना झाला असता. 

आरोग्य व्यवस्थेवर हवा विश्वास 
नांदेडला कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर आता तब्बल तीन हजाराचा आकडा कोरोनाग्रस्तांनी पार केला आहे. त्याचबरोबर नांदेड शहरासह तालुक्याच्या ठिकाणी ग्रामिण भागातही कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. आहे त्या कोविड सेंटरमध्ये तसेच शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेऊन कोरोनाग्रस्त उपचार घेऊन कोरोनामुक्त होत आहेत. या सर्वसामान्यांसाठी नेहमी लढणारे त्यांचेच नेते मात्र, येथील उपचार टाळून मेट्रोसिटीतील मोठ्या रुग्णालयातील उपचाराकडे जात आहेत. त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - मराठवाड्यातील उद्योजकतेचा अनुशेष दूर व्हावा : उद्योजक मुकुंद कुलकर्णी


राजकीय इच्छाशक्ती हवी
नांदेड जिल्ह्यातील राजकारणात सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे काम कोरोना संसर्गातही सुरु आहे तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा आणि त्यातील जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस अधीक्षकांपासून अधिकारी, कर्मचारी कोरोना संसर्ग आटोक्यात यावा, यासाठी युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत. कोणी कुठे उपचार घ्यावेत, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी विश्वासार्हताही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे राजकीय मतभेद, आरोप - प्रत्यारोप टाळून नांदेडच्या विकासासाठी काय हवे? याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती देखील तेवढीच महत्वाची आहे. कोण कुठल्या पक्षात आणि कोण किती मोठा किंवा लहान यांचा विचार करत बसण्यापेक्षा मी नांदेडसाठी काय करु शकतो, याचा विचार हा जास्त झाला पाहिजे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.