आमदार कल्याणकर यांनी दिल्या नांदेड महापालिकेला सूचना

आमदार बालाजी कल्याणकर
आमदार बालाजी कल्याणकर
Updated on

नांदेड - कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात नांदेड शहरातील नागरिकांना काही सवलती देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली असून महापालिकेकडे नांदेडकरांच्या आर्थिक हिताची बाजू मांडली आहे. 

महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना एका पत्राद्वारे महत्वाच्या मागण्या आणि सूचना आमदार कल्याणकर यांनी मांडल्या आहेत. त्यांनी महापालिकेडे नांदेडकरांच्या आर्थिक हिताची बाजू मांडून भाडे, नळपट्टी, कर व शास्तीमध्ये सुट देण्याची मागणी केली आहे. भोगवटदार व भाडेकरु यांना भाड्याच्या रक्कमेत, मालमत्ताधारकांना कर व शास्तीच्या रक्कमेत तसेच नळपट्टीमध्ये सवलत देण्याची मागणी त्यांनी एका पत्राव्दारे केली आहे.

या केल्या आहेत मागण्या...
कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउन काळात नागरिकांची मोठी परवड झाली असून त्यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या भोगवटादार व भाडेकरुंना तीन महिन्याच्या भाड्याच्या रक्कमेमध्ये पन्नास टक्के सुट देण्यात यावी, शहरातील मालमत्ताधारकांना तीन महिन्याची मालमत्ता कर शास्तीची रक्कम शंभर टक्के माफ करण्यात यावी, तीन महिण्याच्या नळपट्टीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी तसेच बांधकाम परवानगी शुल्क रक्कमेत दहा टक्के तर अनाधिकृत बांधकाम शास्ती शुल्क रक्कमेत ५० टक्के सुट द्यावी, अशी मागणी आमदार कल्याणकर यांनी आयुक्त डॉ. लहाने यांच्याकडे केली आहे. 

सभेमध्ये ठेवावा प्रस्ताव
कोरोना संक्रमण काळात नांदेड शहरातील नागरिकांना सदर सवलती देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव आपण महासभेत पाठवून त्यावर प्रशासकीय समर्थन करुन महासभेत मंजूर करुन घ्यावा, असेही आमदार कल्याणकर यांनी आयुक्त डॉ. लहाने यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आमदार कल्याणकर हे नगरसेवक
नांदेड महापालिकेच्या आक्टोंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून बालाजी कल्याणकर निवडून आले होते. शिवसेनेचे ते एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे. सतत दोनदा निवडून आल्यानंतर मागील वर्षी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्याचबरोबर ते नगरसेवक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबत मागणी आणि सूचनांचे पत्रक आयुक्त डॉ. लहाने यांना सादर केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.