नांदेड : नरसी ते बिलोली रस्त्यावर एका व्यापाऱ्याची दुचाकी अडवून त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. यानंतर सव्वासात लाख रुपये जबरीने चोरुन नेले. मात्र सजग नागरिक व पोलिसांच्या मदतीने या चोरट्यांना शिताफीने मुद्देमालासह अटक केली. या तिघांनाही बिलोली न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठविल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्यापारी व नागरिक तसेच पोलिसांचा सत्कार करण्यात आला.
बिलोलीस तालुक्यातील कासराळी येथील व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार हे आपल्या मुनीमासोबत सोमवारी (ता. एक) रात्री दहाच्या सुमारास दुचाकी (एमएच२६-क्यू- ५५५०) वरुन जात होते. यावेळी या दोघांची दुचाकी नरसी फाटा येथून दोन किलोमीटर अंतरावर गेले असतांना पाठीमागून आरोपी शेख मोहीस शेख महेमुद (वय २२), मिर्झा बेग मिर्झा गफार (वय ३२) दोघे राहणार देगलुर नाका, इदगाह रोड नांदेड आणि सुनिल सुरेश सुलगेकर (वय २०) रा. बंदाघाट, नांदेड या तिघांनी दुचाकी (एमएच२६- एडब्लु-९७१३) वरून येऊन अडविले.
रामतिर्थ पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा
चाकुचा धाक दाखवून उपलंचवार व त्यांच्या मुनिमाला चाकुचा धाक दाखवून व त्यानंतर पिस्तुलातून गोळी मारून त्यांच्या जवळ असलेली सव्वासात लाखाची भुईमुग विक्रीतून आलेली रक्कम लंपास केली. मात्र या चोरट्यांना रामतिर्थ पोलिस ठाण्याच सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे व त्यांचे सहकारी आणि गावकरी यांनी पाठलाग करत या तीन्ही चोरटयांना मुद्देमालासह अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनीही यासाठी परिश्रम घेतले. संजय उपलंचवार यांच्या फिर्यादीवरुन रामतिर्थ पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही चोरट्यांना बिलोली न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ता. चार जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.
तिन्ही आरोपी सराईत
या तिन्ही आरोपीवर यापूर्वी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे श्री. मगर यांनी सांगितले. यावेळी संजय उपलंचवार व त्यांचा मुनीम, कासराळी येथील बहाद्दर तरूण यांचा श्री. मगर यांनी सत्कार केला. तसेच रामतिर्थ पोलिसांना बक्षीस जाहीर केले. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर, रामतिर्थचे सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.