नांदेडला शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

नांदेड - शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
नांदेड - शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
Updated on

नांदेड - केंद्र शासनाने नुकत्याच पारित केलेल्या शेतकरी कायद्याचे समर्थन करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी (ता. दोन) दुपारी अडीच वाजता वजिराबाद येथील महात्मा गांधी पुतळा येथे समर्थन व संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन करण्यात आले. प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर समर्थन फेरीची सांगता झाली. 

केंद्र शासनाने शेती व्यापार सुधारणा विधेयके मंजूर करुन शेतकऱ्यांना काही प्रमाणात व्यापार स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला शेतकरी संघटनेने पाठिंबाही दिला आहे, परंतू त्यातील आवश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीत सुधारणा करणे आवश्यक आहे.या व इतर मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, ॲड. धोंडिबा पवार, जिल्हा परिषदेच्या भाजपच्या सदस्या पूनम पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

या केल्या आहेत मागण्या
शेतीमालाच्या किंमती वाढल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्यात त्या पिकाचा समावेश करणारी तरतूद शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, साठवणूक करणाऱ्यांसाठी व निर्यातदारांसाठी घातक आहे. निर्यातीबाबत धरसोडीच्या धोरणामुळे परराष्ट्र व्यापारातील संबंध बिघडत आहेत व शेतीमालाच्या परराष्ट्र व्यापारावर याचा अनिष्ट परिणाम होत आहे, अशी तरतूद देशालाही घातक आहे. सध्या लादलेल्या कांदा निर्यातबंदीचे उदाहरण ताजे आहे. तसेच संपूर्ण कर्जमुक्ती करावी, सरसकट मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना विमा मंजूर करावा, कोरोना काळातील शेती पंपाचे पूर्ण वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना बॅंका कर्ज देत नाहीत, पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना सरसकट रब्बी हंगामासाठी एकरी दहा हजार रूपये अनुदान त्वरीत देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन 
सरकारने शेतीमाल व्यापार, प्रक्रिया व आयात निर्यातीतील हस्तक्षेप पूर्णपणे थांबवून शेतकऱ्यांना व्यापाराचे पूर्ण स्वातंत्र्य द्यावे, ही शेतकरी संघटनेची मागणी आहे. शेतकरी संघटनेच्या मागणीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. दोन ऑक्टोबर) महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या दिवशी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन केले. प्रारंभी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गांधी पुतळा वजिराबाद येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदरील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला व शेतकरी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मास्क लाऊन व शारीरिक अंतराचे पालन करुन आंदोलनात सहभाग नोंदवला.

यांची होती उपस्थिती 
यावेळी किशन पाटील येळेगावकर, व्यंकट पाटील वडजे, रामराव कदम कोंढेकर, आर.पी. कदम, जमुनाबाई ढगे, माधव पाटील सिंधीकर, पंडित हंबर्डे, विठ्ठल रेड्डी, बाबू पाटील, मारोती शिंदे, युवराज पाटील शिंदे, गंगाधर पाटील, गणेश कदम, दत्तराव चौतमल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.